पुण्याची टॉकरवडी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी जुलै महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. दोघेही बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात एकत्र सहभागी झाले होते. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमृता-प्रसाद लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. प्रसाद-अमृताच्या केळवणाचे फोटोही इन्स्टाग्रामवर बरेच व्हायरल झाले होते.
हेही वाचा : “दीपिका सलग अर्धा तास रडत होती”, करण जोहरने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाला, “मानसिक त्रास…”
प्रसाद-अमृताचं लग्न कसं व कुठे होणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच या दोघांनी ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या वेळी दोघांनी लग्न कुठे करणार याबद्दल खुलासा केला आहे.
अमृता देशमुख म्हणाली, “आम्हाला दोघांनाही मोकळ्या जागेत लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे आमच्या लग्नासाठी आम्ही एक ओपन रिसॉर्ट बुक केलं आहे. आमच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना छान अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल. एकंदर आमचं लग्न निसर्गाच्या सानिध्यात (Nature) पार पडेल. लग्न साध्या-सुंदर पद्धतीने पार पडावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” अमृताने या मुलाखतीदरम्यान रिसॉर्टचं नाव उघड केलेलं नाही.
दरम्यान, लग्नाआधी प्रसाद-अमृताने नवीन घर घेतल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. दोघेही येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस’च्या या जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.