Bigg Boss Marathi Contenstant Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदा या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. सोशल मीडियावरून घराघरांत पोहोचलेली रील स्टार अंकिता वालावलकरने देखील या नव्या पर्वात एन्ट्री घेतली आहे. मालवणी चेडू ‘बिग बॉस’च्या घरात गेल्याने तिच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. परंतु, अशातच अंकिताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सोशल मीडिया स्टार असो किंवा सेलिब्रिटी चाहत्यांना नेहमीच हे स्टार्स वैयक्तिक आयुष्यात काय करतात, त्यांचा जोडीदार कोण हे जाणून घेण्याची इच्छा असते. प्रेक्षकांच्या लाडक्या अंकिता वालावलकरने म्हणजेच कोकण हार्टेड गर्लने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे आभार मानत अंकिताने खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. मात्र, अंकिताचा हा ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण आहे याचा उलगडा झालेला नाही. कोकण हार्टेड गर्लने नेमकी काय पोस्ट शेअर केलीये पाहुयात…

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : मृणाली शिर्केने सोडली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका! मुक्ताची बहीण म्हणून झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा प्रोमो

Bigg Boss अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची कबुली

डिअर कोकण हार्टेड बॉय,

रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी २ दिवस बाकी उरलेत फक्त… खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते पण, तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस. तुझे शब्द माझी ताकद आहेत. तू हिंमतीने माझ्याबरोबर उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे. तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन ह्या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. जेव्हा लग्न करु असं आपण ठरवलं आणि big boss ची ऑफर आली, माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. त्यात मी ठरवलं की, तुला जे योग्य वाटेल ते करेन पण, तू म्हणालास “माझा विचार नको करूस… मी आजही आहे, उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा… लवकर ये…पण जिंकून ये, आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग, जिंकण्यासाठी fake वागू नकोस, हरलीस तरी चालेल” हे सगळं लक्षात ठेऊन जातेय, लवकरच येईन पण छान राहून येईन. तू तयारीला लाग… तुझ्याबरोबर १९५ देश फिरायचे आहेत.
फुलांची खूप आठवण येईल…येते…

ता.क.- dyson चा बॉक्स फाडून यशस्वी भव: लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल.

तुझीच,
गुणी पोरगी

anikta
अंकिता वालवलकर Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या…

दरम्यान, अंकिता सध्या Bigg Boss च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ती घराच्या बाहेर आल्यावर खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नासाठी सगळेच उत्सुक आहे. नेटकऱ्यांनी अंकिताने शेअर केलेल्या या रोमँटिक पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, अनेकांनी अंकिताचा हा ‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका आहे तरी कोण याबद्दल विचारपूस केली आहे. आता या रील स्टारचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

Story img Loader