‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री व प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने (Sapna Choudhary) एक आनंदाची बातमी दिली आहे. सपना दुसऱ्यांदा आई झाली आहे. सपनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सपनाने तिचं लग्न व पहिल्या बाळाच्या जन्माची माहिती लपवून ठेवली होती; त्याचप्रमाणे तिने तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी लपवून ठेवली होती. नुकताच तिच्या दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सपनाने हरियाणा येथील मदनहेडी गावात तिच्या दुसऱ्या मुलाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात पंजाबी व हरियाणवी इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले होते. इतकंच नाही तर उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तिचे चाहतेही आले होते. सपनाच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी ३० हजारांहून अधिक लोक नामकरण सोहळ्यासाठी जमले होते, अशी माहिती ‘लाइव्ह हिंदुस्थान’ने दिली आहे.
हेही वाचा – ८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
सपनाला एक मोठा मुलगा आहे, आता तिला दुसरा मुलगा झाला. सपना व वीर साहू यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव प्रसिद्ध पंजाबी गायक बाबू मान यांनी जाहीर केले. सपनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव शाहवीर ठेवण्यात आलं आहे. बाळाच्या नामकरण सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा –
हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम
चार वर्षांपूर्वी सपनाने केलं लग्न
सपना चौधरी व वीर साहू यांनी जानेवारी २०२० मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर सपनाने पहिल्या मुलाला जन्म दिला. दोघांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव पोरस ठेवले होते. आता सपना दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव शाहवीर आहे.
© IE Online Media Services (P) Ltd