‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावामुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव किरण माने फेसबुकवर शेअर करत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : आमिरने जाहीर केली मुलीच्या लग्नाची तारीख, मराठमोळ्या जावयाचं कौतुक करत म्हणाला, “फिल्मी डायलॉग वाटू शकतो पण नुपूर…”

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
Loksatta editorial on pm Narendra modi dig at China in Brunei over supports development not expansionism
अग्रलेख: ‘या’ विस्ताराचे काय?
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
congress mallikarjun kharge on ups
Mallikarjun Kharge : नव्या पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जुन खरगेंची मोदी सरकारवर खोचक टीका; म्हणाले, “यूपीएसमधील ‘यू’ म्हणजे…”

बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत किरण मानेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच लहानपणी ते अमिताभ बच्चन यांचे चित्रपट कसे व कुठे पाहायचे? याचा खुलासा किरण मानेंनी त्यांच्या पोस्टद्वारे केला आहे. सुरुवातीला बेधडक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिग बींच्या स्वभावात गेल्या काही वर्षात कसा बदल झाला याबद्दलही किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : Video : अमिताभ बच्चन यांच्यासह जाहिरातीत झळकणार हेमांगी कवी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

किरण माने यांची पोस्ट

…. या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिगबॉसमध्ये ‘सातारचा बच्चन’ हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती… पन तरीबी ‘मराठी मीम मॉक्स’वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलंवतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.

…”किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” लहानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्‍यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो! लहानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टॉकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.

…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘अँग्री यंग मॅन’ मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी कॉलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !

…पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत! तोच ‘अँग्री यंग मॅन’ वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवनारा हा ‘शहेनशाह’ बघून वाईट वाटायला लागलं… पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी ‘चुप्पी साधलेला’ बघून आश्चर्य वाटायला लागलं… कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करण्याची पोस्ट करनारा… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसनारा… केविलवाना बच्चन बघून कीव यायला लागली..

…पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या माणसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!!

सलाम महानायक, कडकडीत सलाम…

किरण माने

हेही वाचा : “कतरिनाने बिकिनी घातलेली चालते पण, सईने घातली तर…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “प्रेक्षकांना…”

kiran mane
किरण मानेंची फेसबुक पोस्ट

दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे.