छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री महक चहल गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन-चार दिवस महकला व्हेटिंलेटरवरही ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, २ जानेवारीला महकच्या छातीत दुखत होतं. त्यामुळे तिला श्वास घेण्यासही त्रास जाणवत होता. महक बेशुद्ध पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याने महकला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याची माहिती महकने दिली आहे.
हेही वाचा>>“बिग बॉसमध्ये जिंकलेल्या रकमेचं काय करणार?”, अक्षय केळकर म्हणतो…
श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर भीती वाटू लागल्याचं महकने सांगितलं. याबाबत महकने एक पोस्टही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. न्यूमोनिया झाल्यामुळे प्रकृर्ती बिघडल्याचं महकने सांगितलं. आता प्रकृती स्थिर असून मी घरी उपचार घेत असल्याचंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे व निमृत कौरमध्ये जवळीक वाढली; अभिनेत्री म्हणते “इस प्यार को…”
महकने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ मालिकेच्या सीरिजमध्येही ती दिसली होती. याशिवाय ‘बिग बॉस’ हिंदीच्या पाचव्या पर्वातही ती सहभागी झाली होती.