Bigg Boss Fame Marathi Actor New Home : अलीकडच्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांनी नवीन घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले अशा सगळ्या मराठी कलाकारांनी स्वत:चं हक्काचं घर खरेदी करत एक नवीन सुरुवात केली. यांच्याबरोबर ‘बिग बॉस मराठी’ विजेता अभिनेता अक्षय केळकरची सुद्धा काही दिवसांपूर्वीच हक्काचं घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण झाली.

अक्षय केळकरने गेल्या वर्षी म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पासाठी अर्ज केला होता. या सोडतीमध्ये अक्षय विजेता ठरला आणि त्याला हक्काचं घर मिळालं. हे घर अक्षयने अतिशय सुंदररित्या सजवलं आहे. याची झलक अभिनेत्याने यापूर्वी देखील शेअर केली होती. परंतु, या नव्या घरात त्याने वारकऱ्यांच्या प्रतिकृती घडवल्या आहेत. याची झलक आज आषाढी एकादशी निमित्ताने अभिनेत्याने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Priyanka Chopra Marathi film Paani released on OTT
मराठी चित्रपट ‘पाणी’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित, प्रियांका चोप्राचे आहे खास कनेक्शन

हेही वाचा : वयाच्या १० व्या वर्षी सेल्समनचं काम ते करिअर फ्लॉप झाल्यावर स्वत:ची कंपनी! विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या वडिलांमुळे…”

अक्षय केळकरने हातात पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी, वारीत सहभागी झालेली लहान मुलं अशा विविध प्रतिकृती घडवल्या आहेत. त्याने घरात स्वत:च्या हाताने ‘माझी पंढरी’ असं भिंतीवर लिहिल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अक्षय केळकरची पोस्ट

जेव्हा या देवळ्या बनवल्या तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हतं इथे मी नेमकं काय ठेवणार आहे… खूप गोष्टींचा विचार केला होता पण, इथे दैवी गोष्टच यायची होती. माझ्या घरासाठी आलेलं हे एक सुंदर गिफ्ट! तेही माझ्या नव्या शेजाऱ्यांकडून… कलाकार माणूस भेटला.
धन्यावाद @abhijit.music08 सर तुमचे खूप खूप आभार!

या इतक्या सुंदर वारकऱ्यांच्या Idols साठी. माझी पंढरी सजली आणि तुमच्यामुळे इतकी सुंदर सजली. विशेष म्हणजे हे सुंदर वारकरी अभिजीत सरांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे, this set is one and only! So, हे आता फक्त माझ्याकडेच आहेत. Trust me, ही श्रीमंतीच वेगळी आहे!
माझ्या नव्या घरासाठी मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट…
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नव्या घराचे शेजारी अतिशय हुशार आणि खूप दमदार कलाकार आहेत. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार!

akshay
अक्षय केळकर

दरम्यान, अक्षय केळकरच्या या व्हिडीओवर सुकन्या मोने, क्रांती रेडकर, आशिष पाटील, राधा सागर, त्रिशुल मराठे, अमृता धोंगडे यांनी कमेंट्स करत अभिनेत्याने साकारलेल्या या सुंदर कलाकृतीचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader