बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. किरण मानेंनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर लवकरच नव्या भूमिकेत; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार

किरण मानेंनी फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते त्यांच्या बहिणीला होणारा नवऱ्याचा स्वभाव कसा ओळखायचा याचा सल्ला देत आहेत. मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

किरण मानेंची पोस्ट

“…तायडे, तो खूप संयमी, समजूतदार आहे. म्हणून झटपट लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी…, त्या गूपचूप एक असा लॅपटॉप वापरायला दे ज्याचं इंटरनेट कनेक्शन लै म्हंजी लैच स्लो आहे. मगच तुला कळलं त्याचा खरा स्वभाव कसा आहे ते.”

मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत मानेंच्या सल्ल्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी आपले सल्ले दिले आहेत. एकाने लिहिलं आहे “भारीच शक्कल लढवली आहे बघा काय खरं नाही भावड्याचं”. दुसऱ्या युजरने सल्ला देत लिहिलं आहे. “स्वस्तात मस्त सांगतो. पुण्याच्या ट्राफिकमध्ये गाडी चालवायला सांगायची. मागच्या सीटवर बसायचं. मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या घातल्या की समजून जायचं काय समजायचं ते.” तर दुसऱ्याने “त्याच्याकडे कोर्टाच काम द्या मग समजत किती सयंम आहे ते” असा सल्ला दिला आहे.

हेही वाचा- ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आता दिसतो ‘असा’, दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत स्पृहा जोशी म्हणाली…

दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.