मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेले किरण माने सोशल मीडियावरुन समाजातील घडामोडींबद्दल त्यांचं मत मांडत असतात. किरण माने पोस्टद्वारे अनेक घटनांवर व्यक्त होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण मानेंनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “तू पनवती आहेस”, श्रेयस तळपदेने सांगितला मालिकेच्या ऑडिशनदरम्यानचा प्रसंग, म्हणाला, “त्यावेळी…”

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

मला माझ्या भवताली जातीभेदाने, धर्मद्वेषाने बरबटलेला समाज हवा आहे का? ताकदवान लोक दीनदुबळ्यांना तुडवतायत….सो कॉल्ड ‘उच्च’ माणसं इतरांना नीच समजून बडवतायत…भर रस्त्यात तलवारींनी वार करून फाडून टाकतायत…पुरूषी वर्चस्वाचा माज हतबल महिलांची फरपट करतोय…क्रूर, रानटी जनावरांगत विष ओकत फिरणार्‍यांना कुणाचीच भिती नाही. मनात करूणा, दयाभाव आणि हातात मानवतेचा दिवा असणार्‍यांना सुरक्षितता नाही.

माझ्या मनातला ‘आदर्श समाज’ असा आहे का? मला भोवताली स्वातंत्र्य, समता, बंधुता हवी असेल, तर कुणाला राग येण्यासारखं त्यात काय आहे? कुणाचं वाईट होणार आहे यातून आपसात ‘बंधुत्व’ असावं अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय आहे??

‘लोकशाही’ म्हणजे फक्त शासन पद्धती नाही माझ्या भावाबहिणींनो…ती ‘सहजीवन’ पद्धती आहे! आपण कुठल्याही जातीधर्माचे असू…एकमेकांसाठी आदर आणि श्रद्धा असली तर काय बिघडणार आहे आपलं? आपल्या सगळ्यांना आपल्या या महान भारतदेशात मोकळेपणानं वावरण्याचा अधिकार, आपल्या जीवीत आणि सुरक्षेचा अधिकार हवा की नको?

मी कुणी सर्वज्ञ नाही. मी ही यावर विचार करतोय… आपण सगळेच जमल्यास चिंतन करूया… आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपला देश, आपला भवताल पूर्वीपेक्षा अधिक सुंदर, अधिक सुरक्षित, हवाहवासा असावा हे तर सगळ्यांचा वाटत असेल. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्याला आपल्या स्वत:पुरतं काय करता येईल ते करूया.
जय शिवराय, जय भीम !

हेही वाचा>> राज ठाकरेंनंतर ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सीटवर उद्धव ठाकरे बसणार? अवधूत गुप्ते म्हणाला, “मी मातोश्रीवर जाऊन…”

‘बिग बॉस’नंतर लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचलेले किरण माने ‘रावरंभा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात त्यांनी हकीमचाचा ही भूमिका साकारली आहे. ‘रावरंभा’ हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame marathi actor kiran mane instagram post goes viral kak