Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी घडली. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर आता याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. त्यानंतर रुचिरा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली. नुकतंच रुचिराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने मणिपूरमध्ये घडलेल्या त्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
VIDEO: “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; म्हणाली, “घरात नको, तुम्ही बाहेरच…”
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

रुचिरा जाधवची पोस्ट

“रोज अशा “छोट्या मोठ्या” घटना घडतात, आपल्या आजूबाजूला… आपल्या ऐकण्यात वा बघण्यात.. आपण ऐकतो, बघतो, तात्पुरतं रिअॅक्ट करतो आणि सोडून देतो. मग अशी एक घटना घडते जी आपल्याला हलवून टाकते. माणूस म्हणून जन्मल्याची लाज वाटते. पण करायचं काय, हा प्रश्न उभा असतो. पुन्हा रिअॅक्ट होऊन सोडून द्यायचं… अजून काय…!!

पण “शहाणपण” हे समजण्यात आहे की, या सगळ्याचं मूळ कुठे आहे. त्या “छोट्या मोठ्या” घटनेंकडेच आपण दुर्लक्ष केलं नाही ना, तर ही वेळच येणार नाही…

माझ्या बहिणींनो, स्वत:वर अन्याय होऊ देऊ नका. मग तो कितीही छोटा असो किंवा ती सो कॉल्ड “समाजमान्य” गोष्ट असो. तुमच्या विवेक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करायला शिका.

काय आहे ना, Being Women काही गोष्टी “जन्मत:च” आपल्यावर लादल्या जातात. “Granted” घेतलं जातं. आपण ते सगळं मान्य करतो, “ही आपली चूक”
आपल्या बुद्धीला पडत असणारे प्रश्न आपण विचारत नाही..
“ही आपली चूक”
आपण अन्याय सहन करतो
“ही आपली चूक”

एक स्त्री म्हणून रोज नवीन प्रश्न पडतात. “पटतील” अशी उत्तर मात्र कुठेच सापडत नाहीत. आणि याला जबाबदार केवळ “पुरुषवर्ग” नाहीये हा.. याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने स्त्रीजातीला “गृहीत” धरलंय. हे थांबलं पाहिजे.

ruchira says I urge for EQUALITY

कारण हेच “मूळ” आहे”, अशी पोस्ट रुचिरा जाधवने केली आहे.

आणखी वाचा : बजेट फक्त ५ कोटी, कमाई मात्र दहापट; ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

दरम्यान रुचिराने ही पोस्ट शेअर करताना हात जोडण्याचा इमोजी कॅप्शन म्हणून टाकला आहे. त्याबरोबरच तिने मणिपूर घटना अशा हॅशटॅगही दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.