सध्या सगळीकडे आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएलचा १६वा सीझन जोरदार सुरू आहे. बिग बॉस विनर एमसी स्टॅनलाही क्रिकेटची भुरळ पडली आहे. स्टॅनने चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सचिन तेंडुलकरबरोबरचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
स्टॅनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो बॉलिंग करत आहे. तर सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना दिसत आहे. स्टॅनने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरबरोबरचे काही फोटोही एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्याने “तुम्हाला लहानपणासून टीव्हीवर पाहिलं आहे. आज तुम्हाला भेटणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” असं कॅप्शन दिलं आहे. एमसी स्टॅनची ही पोस्ट चर्चेत असून त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षावही केला आहे.
‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन प्रसिद्धीझोतात आला. त्याच्या चाहत्यांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर स्टॅनला अनेक ब्रँडकडून ऑफरही मिळाल्या आहेत.