आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एखाद्या सणाप्रमाणे आज दिवस साजरा केला जात आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ही मराठी अभिनेत्री म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेली नेहा शितोळे. नेहाने शिवजयंतीनिमित्ताने एक खास पोस्ट लिहिली आहे. तसेच महाराजांवर गाणं लिहिण्याची संधी दिल्याबद्ल तिने महेश मांजरेकर यांचे आभार मानले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Video: साखरपुड्यातला प्रथमेश परबचा भावाबरोबरचा भन्नाट डान्स पाहिलात का? अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ गाण्यावर थिरकले

अभिनेत्री नेहा शिताळेने लिहिलं आहे, “पराक्रमी राजा, शत्रूचा कर्दनकाळ, युद्धनिष्णात वीर आणि महाराष्ट्राचा प्राण…याही पलीकडे एक द्रष्टा नेता, एक सुस्वभावी आणि स्त्रिदाक्षिण्य असणारा पुरुष, एक मुत्सद्दी राजकारणी, एक निर्मळ मनाचा माणूस म्हणून ज्या वेळी आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघायला सुरुवात करू तेव्हाच कदाचित ते पुन्हा जन्म घेऊन आपल्याला मार्ग दाखवतील…तोपर्यंत त्यांची आळवणी करणं आपल्या हातात आहे…”

पुढे तिने महेश मांजरेकरांचे आभार व्यक्त करत लिहिलं आहे, “सर, हे गाणं मला जसं हवं तसं लिहू दिल्याबद्दल आणि माझे विचार मांडू दिल्या बद्दल धन्यवाद…ज्या कुठल्या प्रेरणेने माझ्याकडून हे लिहून घेतलं त्या शक्तीचे आभार…आणि या शाहीराच्या शब्दांना सूर देण्यासाठी @hiteshmodak तुमचेही आभार…”

हेही वाचा – आदित्य नारायणने कॉन्सर्टमध्ये फोन फेकलेल्या चाहत्याला मिळाला नवा मोबाइल, गायकाने नाहीतर ‘यांनी’ दिला भेट…

दरम्यान, नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात नेहाने खिलाडूवृत्ती अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे ती अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Story img Loader