Yuvika Chaudhary Baby Shower: रिअॅलिटी टीव्ही स्टार प्रिन्स नरुला (Prince Narula) व ‘बिग बॉस’ फेम युविका चौधरी लवकरच आई- बाबा होणार आहेत. प्रिंन्स व युविका लग्नानंतर सहा वर्षांनी कुटुंबात छोट्या सदस्याचं स्वागत करणार आहेत. युविका व प्रिन्सने काही दिवसांपूर्वी पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली होती, त्यानंतर आता युविकाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युविका चौधरी तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्साही आहे. तिने तिच्या बेबी शॉवरसाठी पांढऱ्या रंगाचा ड्रेस निवडला. या ड्रेसमध्ये ती खूपच क्युट दिसत होती. तिचा हा ड्रेस ऑफ-शोल्डर स्लीव्हज व स्वीटहार्ट नेकलाइन असलेला होता. तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या कार्यक्रमात युविकाचा पती प्रिन्स नरुला याने पांढऱ्या पँटसह हलका निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात दोघांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. युविकाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बुधवारी रात्री ( ७ ऑगस्ट २०२४ रोजी) पार पडला.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

युविका चौधरीच्या बेबी शॉवरमधील फोटो ( फोटो सौजन्य – निशा रावल)

युविका व प्रिन्सचा क्यूट व्हिडीओ-

Yuvika Chaudhary Baby Shower VIdeo: प्रिन्स व युविकाचा एक व्हिडीओ ‘वूम्पला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोघेही क्यूट पोज देताना दिसत आहे. तसेच प्रिन्स प्रेमाने युविकाच्या बेबी बम्पलवर किस करताना दिसतोय. या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

प्रिन्स नरुला व युविका चौधरी लव्ह स्टोरी –

Yuvika Chaudhary- Prince Narula Love Story: युविका व प्रिन्स यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहे. दोघांची लव्ह स्टोरी रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ९’मध्ये सुरू झाली होती. ते या शोमध्ये भेटले होते व तिथेच प्रेमात पडले. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४१ वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमात पडल्यावर आणि काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सहा वर्षांनी हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी हे दोघेही खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame prince narula wife yuvika chaudhary baby shower video hrc