‘बिग बॉस'(Bigg Boss) हा शो नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. आतापर्यंत बिग बॉसचे १८ सीझन या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रत्येक सीझनचे काहीतरी वेगळेपण दिसले आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात. काही वेळा काही जोडपीदेखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहेत. त्यामध्ये रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, अंकिता लोखंडे-विकी जैन यांचा समावेश होता. त्याबरोबरच काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात आल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात; तर काही कलाकार रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण येते. अशाच चर्चेत असलेल्या एक जोडीपेकी अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांची जोडी आहे. आता मात्र बिग बॉसमध्ये झळकलेले अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.

अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी या दोन कलाकारांना ‘उडारियाँ’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. ‘उडारियाँ’ या शोनंतरही ते अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करीत असल्याचे दिसले होते. त्यानंतर ते बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करीत असल्याचे म्हटले जात होते. इतकेच नाही, तर ते लवकरच लग्न करतील, अशा चर्चांनाही उधाण आले होते. या कलाकारांनी मात्र ते फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर या कलाकारांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. चाहते त्यांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी प्रार्थना करीत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

अंकित आणि प्रियांका यांनी उडारियाँ या शोमध्ये फतेह आणि तेजो या भूमिका साकारल्या होत्या. या शोमधून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी जेव्हा बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला, त्यावेळी त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. प्रियांका चहर चौधरी ही सेकंड रनर अप ठरली होती; तर अंकित या खेळातून लवकर बाहेर पडला असला तरी त्याच्या खेळाचे मोठे कौतुक झाले होते. मालिका व बिग बॉसबरोबरच ते अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही एकत्र काम करताना दिसले आहेत. लवकरच ते ‘तेरे हो जायें हम’ या मालिकेतही एकत्र दिसणार आहेत.

अंकित गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो साडा हक, बालिका वधू अशा मालिकांमध्ये दिसला आहे. तर, प्रियांका चहर चौधरी लवकरच तेलुगू सिनेमात दिसणार आहे. हीरो हिरॉईन, असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर दिव्या खोसला कुमारदेखील दिसणार आहे.

Story img Loader