हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिद्धिमा पंडितला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’, ‘बहु हमारी रजनीकांत’ या कार्यक्रमांमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. ऐन तिशीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला होता. रिद्धिमाने नुकत्याच डिजिटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिने बीजांडे गोठवण्याचा ( Eggs Freeze ) कठीण प्रसंग सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मातृत्व व एग्ज फ्रीज याबद्दल आपलं मत मांडताना रिद्धिमा म्हणाली, “माझ्यासाठी मातृत्व ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेकांची यावर विविध मतं असू शकतात. पण, माझ्या आयुष्यात याचं महत्त्व खूप आहे. वयाच्या तिशीत मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात जैविक जडणघडण होत (बायोलॉजिकल क्लॉक) असते. दैनंदिन बदलामुळे एका ठराविक काळानंतर प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील एग्ज कमी होत जातात याची मला जाणीव होती. याशिवाय या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देखील मला होतं.”

हेही वाचा : “मराठी सिनेमा ठराविक लोकांच्या हातात”, पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं स्पष्ट मत; ‘त्या’ दोन निर्मात्यांचा उल्लेख करत म्हणाले…

रिद्धिमा पुढे म्हणाली, “या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अजिबात सोप्या नव्हत्या. एग्ज फ्रीज करण्यासाठी खूप इंजेक्शन्स घ्यावी लागतात. शरीर फुगलेलं असतं. वजन खूप जास्त वाढतं, त्रास होतो. परंतु, हे चिंताजनक नाही हळुहळू सगळ्या गोष्टी कमी होतात. हार्मोनल इंजेक्शनमुळे तुम्ही खूप जाड होता हा फक्त गैरसमज आहे. खूप बदल होतो असं होत नाही पण, थोडा बदल जाणवतो.”

हेही वाचा : ‘झी मराठी’ सुरू होणार ‘नवरी मिळे हिटलरला’! निर्माती शर्मिष्ठा राऊतने शेअर केला सेटवरचा व्हिडीओ; म्हणाली…

लग्नाविषयी विचारलं असता रिद्धिमा म्हणाली, “मला नाही माहिती माझ्या आयुष्यात लग्न करणं आहे की नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला जोडीदार कसा मिळतो यावर अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांत अनेक स्त्रिया एकटं राहायला पसंती देत आहेत. पण, या सगळ्यात मी माझं बायोलॉजिकल (एग्ज फ्रीज) काम पूर्ण केलं आहे. आता मला कसलीच चिंता नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame ridhima pandit talks about difficulties in freezing eggs and motherhood sva 00