मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात सईने २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर महिन्यात गोड मुलीला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यावर अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. याद्वारे तिने गरोदरपणातील काही अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई लोकूरला तिच्या चाहतीने “तुझं बाळंतपण नैसर्गिकरित्या झालं (नॉर्मल) की सिझेरियन?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “माझी सी-सेक्शन डिलिव्हरी झाली आहे. मला स्लिप डिस्कची समस्या असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिझेरियन डिलिव्हरी करण्यात आली.”

हेही वाचा : हातात सुवर्णपदक, माहेर अन् सासरची साथ…; मुग्धा वैशंपायनला मिळालं मोठं यश! पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर म्हणाली…

सई पुढे म्हणाली, “मला पाठीचा भयंकर त्रास होत असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नव्हती. त्यामुळे माझे ऑर्थोपेडिक ( हाड वैद्य), स्त्रीरोगतज्त्र, भूलतज्ज्ञ या सगळ्यांनी मिळून आणि अर्थात माझ्या सहमतीने आम्ही सी-सेक्शन डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेला तितीक्षा तावडेचा प्लॅन काय? म्हणाली, “सिद्धार्थबरोबर…”

अभिनेत्री सई लोकूर

दरम्यान, सई लोकूरला या व्यतिरिक्त बाळंतपणाशी संबंधित अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारले. अभिनेत्रीने तिच्या बहुतांश चाहत्यांच्या प्रश्नांना या ‘आस्क मी सेशन’मध्ये उत्तरं दिली आहे. १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने गोंडस मुलीला जन्म दिला. तिने तिच्या लेकीचं नाव ‘ताशी’ असं ठेवलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame sai lokur undergo c section delivery due to slip disc reveals in instagram ask me session sva 00