Deepak Thakur Wedding : ‘बिग बॉस १२’ फेम लोकप्रिय गायक दीपक ठाकूर विवाहबंधनात अडकला आहे. दीपक ठाकूरने वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. त्याने रविवारी (२४ नोव्हेंबर रोजी) पाटण्यात लग्न केलं. त्याने लग्नाचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. दीपक ठाकूरच्या पत्नीचे नाव नेहा चौबे आहे.

‘बिग बॉस’ फेम दीपक ठाकूरने लग्नगाठ बांधली आहे. दीपकची पत्नी नेहा ही सामाजिक कार्यकर्ती आहे. दीपक आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करून खूप आनंदी आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या पत्नीबरोबरचे रील आणि फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – मलायका अरोरानंतर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीचं ब्रेकअप; म्हणाली, “इतकी वर्षे झाली, मी…”

दीपक ठाकूर हा बिहार येथील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. तो त्याच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोच्या १२ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्याला या शोमधून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दीपकने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘भैया जी’ सारख्या लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांतील गाणी गायली आहे.

हेही वाचा – अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल म्हणाला, “मला माहीत आहे की ऐश्वर्या…

दीपक ठाकूरची पत्नी नेहा चौबे हिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. दीपकचे चाहते त्याला आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

Story img Loader