‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असल्यामुळे तिचे व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होत असतात. नुकताच सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये ती एका समस्येविषयी बोलताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: अखेर सईला मिळणार आईची माया? असा रंगणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड…

Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

‘का? कृपया मला सांगा,’ असं लिहीत सोनालीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून ती चाहत्यांना सांगतेय, “बरं आज एक कार्यक्रम आहे. त्यासाठी तयार झाली आहे. तुम्हाला दिसत असेल मी छान मेकअप केलाय. पण कालपासून मला एक प्रश्न पडलाय. ही पुरळ का आली असेल? आपला जेव्हा खूप महत्त्वाच्या कार्यक्रम असतो. तेव्हा अशी पुरळ का येते? म्हणजे कशासाठी? बरं हे एवढं दिसतंय आणि दुखतंय ना. मुलींच हे दुःख मुलींनाच माहिती आहे. पण महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान अशी पुरळ का येते? इतकं गरजेचं असतं का?”

हेही वाचा – अजूनही ‘जवान’ची क्रेझ; अभिनेता अजिंक्य राऊतचा शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”

सोनालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहीलं, “नजर लागली ना तर पुरळ उठतात. नक्कीच माझी किंवा चाहत्यापैकी कोणाची तरी नजर लागली असेल. मिरची ओवाळून काढून घेत जा.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, सोनाली जेव्हा तुला नजर लागते ना तेव्हा पुरळ चेहऱ्यावर येता. तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, तो प्रमुख पाहुणा आहे. त्यामुळे नेमकं त्याचं वेळेला तो येतो.

हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

दरम्यान, सोनालीनं ‘बिग बॉस मराठी’ पूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिकामध्ये झळकली होती. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.

Story img Loader