अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. दोघांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रसाद-अमृताची जोडी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वापासून घराघरांत चर्चेत आली होती. ‘बिग बॉस’च्या घरात दोघांची ओळख व मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद-अमृताच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. लग्नानंतर दोघांनीही आपल्या नव्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरूवात केली आहे. प्रसाद-अमृताच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या लग्नात या नव्या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं. दोघांसाठी असंख्य पोस्ट शेअर केल्या होत्या आता अशातच आणखी एका मराठी अभिनेत्रीने प्रसाद-अमृतासाठी खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी आतापर्यंत छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. पुणे-मुंबई प्रवास करताना त्यांची आणि प्रसाद-अमृताची फूड स्टॉलवर भेट झाली. या भेटीचं आणि प्रसाद-अमृताच्या सुंदर नात्याचं सुरेखा यांनी अगदी मोजक्या शब्दात सुंदर वर्णन केलं आहे.

हेही वाचा : वयात अंतर, घरच्यांचा विरोध अन्…; ‘अशी’ आहे स्नेहल आणि प्रवीण तरडेंची प्रेमकहाणी, सुखी संसाराला झाली १४ वर्षे!

सुरेखा कुडची लिहितात, “कोण कधी कुठे भेटेल काही सांगता येत नाही…पुणे – मुंबई प्रवास करताना फूड मॉलला थांबलो अचानक समोर नवीन लग्न झालेलं जोडपं आलं… अहो आपली सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजेच अमृता आणि प्रसाद… लग्नाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि फोटो तो बनता है बॉस… बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं असंच आपण आतापर्यंत पाहिलंय पण, हे दोघेही अपवाद! खूप मनापासून आनंद झाला… त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!”

हेही वाचा : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अक्षया देवधर पोस्ट करत म्हणाली, “माझा नवरा…”

दरम्यान,सुरेखा कु़डची यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘स्वाभिमान’, ‘रुंजी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘कळत नकळत’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय सुरेखा कुडची ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame surekha kudchi shares special post for newly weds prasad jawade and amruta deshmukh sva 00