‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील तिची ‘नागिन’ मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. तेजस्वी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “रोमान्स, फॅमिली ड्रामा अन् ब्रेकअप…”, रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Marathi actress Abhidnya Bhave Special Post For Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra
Bigg Boss 18: “अखेर खरा निकाल लागला…”, करणवीर मेहरा विजयी होताच लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट, दोघांनी एकत्र केलं होतं काम
Bigg Boss 18 Grand Finale chahat pandey and salman khan
‘बिग बॉस’च्या मंचावर सलमान खानला घातली लग्नाची मागणी, I Love You सुद्धा म्हणाली; चाहत पांडेला भाईजानने काय उत्तर दिलं?
priya bapat opens up on viral intimate scene
“खूप रडले, बाबांना फोन केला…”, ‘त्या’ इंटिमेट सीनवर प्रिया बापटचं भाष्य; म्हणाली, “ती क्लिप व्हायरल होणं…”
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य

तेजस्वी प्रकाशने मीडियाशी संवाद साधताना बालपणी तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबाबत खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “दहावीनंतर मी आणि माझ्या मैत्रिणीने दररोज सकाळी जॉगिंग करण्यास सुरुवात केली होती. जॉगिंग करून झाल्यावर आम्ही चिकन पॅटीस खायचो आणि नंतर घरी जायचो. तिचे घर माझ्या घराच्या आधी यायचे, नेहमीप्रमाणे पॅटीस खाल्ल्यावर माझी मैत्रीण घरी गेली आणि मी माझ्या घराच्या दिशेने जाऊ लागले.”

हेही वाचा : “गणपती बाप्पा मोरया!” ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, कलाकारांनी शेअर केले फोटो

तेजस्वी पुढे म्हणाली, “मी घराच्या दिशेने जात असताना मला वाटेत दोन मुलं दिसली, सकाळचे सहा वाजले होते त्यामुळे आजूबाजूला गर्दी नव्हती. ती दोन मुलं बाईकवरून फेऱ्या मारत, एकमेकांशी काहीतरी बोलत होती. त्यांनी माझा खूप वेळ पाठलाग केला, तेव्हा मी घाबरून जवळच्या एका सोसायटीमध्ये गेले. तेथील सुरक्षा रक्षकाने मला अडवले मी त्याला विनंती केली की, मला आतमध्ये सोडा. शेवटी तिकडच्या एका बागेत मी जवळपास अर्धा तास लपून बसले त्यानंतर मग घरी जाण्यासाठी बाहेर आले.”

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने केले टक्कल, तिरुपती मंदिराजवळील नवा लुक पाहून चाहते हैराण

अभिनेत्री पुढे म्हणाली, “बाहेर पडल्यावर मला ती दोन मुलं अजूनही माझा पाठलाग करत असल्याचा भास होत होता, त्यांना माझे घर कळेल म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. तिच्या घरी तिचे दोन मोठे भाऊ होते त्यामुळे मी निर्धास्त राहिले. पुढे आठवड्यानंतर मी पुन्हा तेच कपडे घालून घराबाहेर पडले तेव्हा संध्याकाळची वेळ होते आणि ती मुलं तशीच बाईकवर फिरत होती.”

दरम्यान, अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने बिग बॉस शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. यापूर्वी तिने ‘पहरेदार पिया की’, ‘स्वरागिनी’, ‘संस्कार’ आणि ‘खतरों के खिलाड़ी’ अशा लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

Story img Loader