मुंबई लोकल ट्रेनचं प्रत्येक सामान्य माणसाशी एक वेगळं नातं तयार झालं आहे. कामावर जाणारे चाकरमानी असो किंवा शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी प्रत्येकजण दैनंदिन प्रवास लोकल ट्रेनने करतात. मुंबईच्या या मायानगरीत अनेक कलाकार आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात हे लोक सुद्धा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होते. आज जरी बहुतांश सेलिब्रिटींकडे आलिशान गाड्या असल्या तरीही शेवटी वेळप्रसंगी अनेकदा लोकलने प्रवास करावा लागतो. असाच काहीस अनुभव एका ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने आला.
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेता विकास पाटीलने काम केलं आहे. परंतु, ‘बिग बॉस’ कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. सध्या अभिनेता नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रयोगानिमित्त अभिनेत्याने नुकताच वेळेची बचत करण्यासाठी मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केला. याचा खास अनुभव अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे काँग्रेस आमदाराची लेक, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? वडील म्हणाले…
विकास पाटीलची पोस्ट
नाटकाच्या निमित्तानं खूप साऱ्या गोष्टी नव्याने ट्राय करता आल्या. ज्या कधी काळी करत होतो किंवा पहिल्यांदाच करायला मिळाल्या..त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मंबई लोकलने प्रवास! मुंबईत सुरुवातीला आलो तेव्हा लोकल हीच lifeline होती, मग कालांतराने बाईक आली… मग कार आणि लोकलशी नातं तुटत गेलं..पण, ऑल दी बेस्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा या lifeline चं महत्व कळालं..कारण, मुंबईत कुठेही वेळेत पोहोचायचं असेल आणि खास करून प्रयोगासाठी तर लोकलला पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं…असाच हा एक प्रवास बोरिवली ते चर्नी रोड…गिरगाव साहित्य संघातला प्रयोग.. ETA 45 minutes
दरम्यान, विकासने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्चा वर्षाव केला आहे. “तुम्हाला कोणी ओळखलं नाही का ट्रेनमध्ये?”, “खूप सुंदर” अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत.