Yogita Chavan & Saorabh Choughule : ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती. यामध्ये त्यांनी अंतरा व मल्हार या प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिका संपल्यावर पुढे काही महिन्यांनी अचानक सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत योगिता आणि सौरभने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या दोघांच्या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ या शोमुळे चर्चेत आली होती. मात्र, तिने मानसिक तणावामुळे हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. या काळात योगिताला सौरभने खंबीरपणे साथ दिली.
योगिता ( Yogita Chavan ) आणि सौरभकडे आजची तरुणपिढी ‘Couple Goals’ म्हणून पाहते. आज नाताळनिमित्त अभिनेत्याने आपल्या लाडक्या बायकोसाठी आणखी एक खास गोष्ट केली आहे. याबद्दल योगिताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
योगिताला ( Yogita Chavan ) नाताळ सण खूप आवडतो. त्यामुळे बायको शूटिंगला गेल्यावर सौरभने संपूर्ण घरात ख्रिसमसचं खास डेकोरेशन केलं होतं. अभिनेत्रीला शूटिंग संपल्यावर घरी आल्यावर, दार उघडताच ही संपूर्ण सजावट पाहायला मिळाली. ही सगळी घरभर केलेली सजावट पाहून योगिता भारावून गेली होती. याचा व्हिडीओ शेअर करत तिने नवऱ्यासाठी सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे.
योगिता चव्हाणची पती सौरभसाठी खास पोस्ट
Christmas मला किती आवडतो हे सौरभला माहीत होतं म्हणून, मी शूटिंगसाठी बाहेर गेलेले असताना त्याने घरात असा उद्योग केला.
उद्योग म्हणजे एक मोठं सरप्राईज दिलं, ९ फुटांचं मोठं ख्रिसमस ट्री आणि इतकंच नाही तर ख्रिसमसचं डेकोरेशन (ज्यातलं खरंतर त्याला काही कळत नाही) पण मित्रांची मदत घेऊन खूप सुंदर असं डेकोरेशन घरभर केलं. आपला पार्टनर आपल्या आवडीनिवडींची (unreasonable आवडीनिवडींचा )किती काळजी घेतो हे बघून कोणालाही आनंदच होईल… आणि तो मला इतका ओळखतो की हे कॅप्शन लिहायला पण त्यानेच मदत केली
PS- आता मी Santa ला नवसच करणार आहे की, पुढच्या सातजन्मात हाच नवरा मिळूदेत.
हेही वाचा : हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
दरम्यान, योगिताच्या ( Yogita Chavan ) पोस्टवर कमेंट्स करत अनेक मराठी कलाकारांनी सौरभने घरात केलेल्या सुंदर सजावटीचं कौतुक केलं आहे.