Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये रेशनवरून जबरदस्त वाद पाहायला मिळाले. अविनाश मिश्राने रेशन वाटप नीट न केल्यामुळे घरात सातत्याने वाद होतं होते. चाहत आणि अविनाशमध्ये टोकाचे वाद झाले. ज्यावरून सलमान खानने वीकेंड वारला अविनाशला चांगलंच सुनावलं. पण चौथ्या आठवड्यात रेशनवरील वाद कमी होतील अशी शक्यता आहे. कारण अविनाश आणि अरफीन खान जेलमधून बाहेर आले असून आता जेलमध्ये सारा खान आणि तजिंदर बग्गा आहेत. त्यामुळे घरातील सदस्यांना सारा आणि तजिंदर रेशनचं व्यवस्थित वाटप करतील, असा विश्वास आहे. अशातच आता चाहत पांडेला ‘बिग बॉस’ने एक मोठी पॉवर दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

limboo_india या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील पुढील भागाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना एक प्रश्न विचार आहेत. ते विचारतात, “या घरात सर्वात जास्त अस्ताव्यस्त असणारा माणूस कोण आहे.” तेव्हा विवियन डिसेना म्हणतो की, चाहत अस्ताव्यस्त असणारी व्यक्ती आहे. त्यानंतर इतर सदस्यांनीदेखील चाहतचं नाव घेतलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ जाहीर करतात की, आता तिला सुधारण्याची आवश्यकता आहे. वर्गातील सर्वात आगाऊ मुलगा तेव्हाच सुधारतो जेव्हा तो मॉनिटर होतो.

Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
prasad jawade wife amruta deshmukh writes romantic post after husband won best actor award
“लग्न झाल्यावर वनवास भोगायला…”, पुरस्कार जिंकल्यावर प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ची खास पोस्ट! अमृता म्हणाली…
Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”

हेही वाचा – Video: “अब भौकाल भी बडा होगा और पडदा भी”, ओटीटीनंतर मोठा पडदा गाजवणार ‘मिर्झापूर’ चित्रपट, लवकरच होणार प्रदर्शित

पुढे ‘बिग बॉस’ चाहतला एक मोठी पॉवर देतात आणि म्हणतात, “चाहत आता तू घरातील सर्व सदस्यांना त्यांची ड्यूटी देणार आहेस.” हे ऐकून चाहतला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण विवियनसह इतर सदस्यांना झटका बसला असून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘सिंघम अगेनच्या’मधील एका अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगणला २-३ महिने…, सलमान खानने सांगितला ‘तो’ प्रसंग

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “व्वा आता मज्जा येणार”, “ही बिग बॉसची लाडकी सून आहे”, “मला खूप आनंद झाला”, “आता विवियनची मज्जा येणार”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: “अशा काहीही अफवा पसरवू नका”, ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने केली विनंती, नेमकं काय घडलं? वाचा…

दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्य बेघर झाले. आठवड्याच्या मधेच मुस्कान बामने हिला घरातील सदस्यांनी बहुमताने घराबाहेर केलं. त्यानंतर वीकेंड वारला प्रेक्षकांच्या मतानुसार नायरा बनर्जी एविक्ट झाली. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’मधून चार सदस्य बेघर झाले आहेत. मुस्कान आणि नायराच्या आधी हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते हे दोघं घराबाहेर झाले होते.

Story img Loader