बहुचर्चित ‘बिग बॉस हिंदी’चं नव पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात इमली फेम अभिनेत्री संबुल तौकीरही सहभागी झाली आहे. संबुलचं नाव अभिनेता शालीन भानोतशी जोडलं जात होतं. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात आता टीना दत्ता आणि शालीनच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.
‘बिग बॉस हिंदी’च्या ‘शुक्रवार का वार’मध्ये संबुल तौकीरचे वडील हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘शुक्रवार का वार’मध्ये संबुलच्या वडिलांना पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. व्हिडीएमध्ये संबुलच्या वडिलांनी तिला सल्ले देत शालीनला खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा >> शिल्पा शेट्टीच्या चाळणीने चेहरा लपवल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले…
“संबुल तू खूप चांगली आहेस. तुझं मन शुदध आहे. पण तुझ्या या स्वभावाचा घरातील लोक फायदा घेत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील काही जण तुझा वापर करत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहून मला खूप त्रास होत आहे. संबुल मला भीती वाटत आहे.”, असं संबुलचे वडील तिला म्हणाले. वडिलांचे हे बोल ऐकून संबुललाही अश्रु अनावर झाले.
हेही वाचा >> “नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकोणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा
शालीनने संबुलबरोबर केलेल्या वर्तनामुळे तिच्या वडिलांना त्याला सुनावल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “शालीन संबुल तुला खूप चांगल्या मनाने भेटली होती. परंतु, तू काय केलंस? तू त्याचा तमाशा केला आहेस. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती”, असं म्हणत संबुलच्या वडिलांनी शालीनला फटकारलं आहे.
‘बिग बॉस’च्या घरात टीना आणि शालीनचं नातं पुढे कोणतं वळण घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शालीनने टीनाला प्रपोज करत आय लव्ह यू म्हटलं आहे. त्यांच्या दोघांमधील संभाषणाची ऑडीओ क्लिप कलर्स टीव्हीने शेअर केली आहे.