Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Live Updates, 06 October 2024 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘बिग बॉस’ हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सुरुवातीला फक्त हिंदीमध्ये ‘बिग बॉस’ शो असायचा. पण काही वर्षांपासून ‘बिग बॉस’ आता विविध भाषांमध्ये होतं आहे. तसंच ‘बिग बॉस ओटीटी’देखील पाहायला मिळत आहे. आजपासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात होतं आहे.
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस १८’चा आज ग्रँड प्रिमियर आहे. यंदाही होस्टिंगची धुरा सलमान खान सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांची नाव चर्चेत आहेत. शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, शांति प्रिया, अविनाश मिश्रा, देव चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे आणि गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे. पण यापैकी कोण-कोणते स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जातायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या ग्रँड प्रिमियरमधील प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या…
Bigg Boss Hindi Season 18 Grand Premiere Live, 06 October 2024 | ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार?
सलमान खानच्या बहुचर्चित शोमध्ये गाढवाची एन्ट्री झाली आहे. हे पाळवी गाढव असून ते गुणरत्न सदावर्तेंचं असल्याचं म्हटलं जात आहे. मॅक्स असं या गाढवाचं नाव आहे.
२७ वर्षी अभिनेत्री एलिस कौशिक दिल्लीची राहणारी आहे. पंड्या स्टोर नावाच्या लोकप्रिय मालिकेतील एलिश झळकली होती. आता ती 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वात आपला खेळ दाखवण्यासाठी सहभागी झाली आहे.
बिग बॉस १८च्या घरात हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा विवियन डिसेनाने प्रवेश केला आहे. आठ वर्षांनंतर विवियनने 'बिग बॉस'ची करण्यासाठी होकार दिला. याआधी तो सातत्याने 'बिग बॉस' ऑफर नाकारत होता.
'व्हायरल भाभी' म्हणून लोकप्रिय असलेल्या हेमा शर्माची 'बिग बॉस १८'च्या घरात प्रवेश केला आहे.
अभिनेत्री ईशा सिंहनंतर ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस १८'च्या पर्वात एन्ट्री झाली आहे.
‘इश्क का रंग सफेद’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आणि ‘सिर्फ तुम’सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ईशा सिंहने सलमान खानच्या शोमध्ये एन्ट्री केली. २०१५ साली वयाच्या १७व्या वर्षी ईशाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आज ती हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
हृतिक रोशनचा खास मित्र अरफीन खान पत्नीसह 'बिग बॉस १८'मध्ये सहभागी झाला आहे. सारा खान असं अरफीनच्या पत्नीचं नाव आहे. माहितीनुसार, अरफीन माइंड ट्रेन करतो.
अनुपमासह बऱ्याच हिंदी मालिकेत पाहायला मिळालेली अभिनेत्री मुस्कान बामनेची 'बिग बॉस १८' एन्ट्री झाली आहे.
सोशल मीडियावर लोकप्रिय फिटनेस ट्रेनर, पॉवर लिफ्टर रजत दलालची सलमान खानच्या शोमध्ये एन्ट्री झाली आहे. रजतचे इन्स्टाग्रामवर १.१ मिलियन आणि युट्यूबवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
'खतरों के खिलाडी'च्या १४व्या पर्वाचा विजेता करण मेहराची 'बिग बॉस' घरात जबरदस्त एन्ट्री
अरुणाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 'बिग बॉस १८'च्या घरात आली अभिनेत्री चुम दरंग
हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयासह अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री नायरा बनर्जीची 'बिग बॉस १८'च्या घरात एन्ट्री झाली आहे.
तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्री गाजवणारी श्रुतिका अर्जुन हिची बिग बॉस घरात एन्ट्री झाली आहे.
भारतीय जनता पार्टीचे दिल्ली यूनिटचे प्रवक्ता तेंजिदर पाल सिंह यांची 'बिग बॉस १८'मध्ये एन्ट्री झाली आहे.
९०चं दशक आपल्या बोल्ड आणि घायाळ अदांनी गाजवणारा मराठी चेहरा म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची 'बिग बॉस १८'मध्ये एन्ट्री झाली आहे. त्यांचं सलमान खानबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं; जे आता ‘बिग बॉस १८’च्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. शिल्पा शिरोडकर यांचं खास नातं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी आहे. महेश बाबूच्या त्या मेव्हूणी आहेत. शिल्पा शिरोडकर यांची सख्खी बहीण नम्रता शिरोडकर महेश बाबूची पत्नी आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला सूरज चव्हाण, तर उपविजेता ठरला अभिजीत सावंत
अभिनेता शेहजादा धामी आणि अविनाश मिश्राची 'बिग बॉस १८'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी
हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चाहत पांडेची 'बिग बॉस'च्या १८व्या जबरदस्त एन्ट्री. आठ वर्ष चाहत अभिनय क्षेत्रात काम करत असून तिने अनेक मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाची हटके सुरुवात झाली आहे. सलमान खानने टॉप-२ फायनलिस्ट जाहीर केल्यानंतर संपूर्ण बिग बॉसच्या आलिशान घराची झलक दाखवण्यात आली आहे.
लवकरच 'बिग बॉस १८'च्या ग्रँड प्रिमियरला होणार सुरुवात
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला अवघे काही तास बाकी आहेत. ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण ‘बिग बॉस १८’चे नवनवीन प्रोमो पाहून सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. कोण-कोण कलाकार ‘बिग बॉस’च्या या खेळात सहभागी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण अशातच एका अभिनेत्रीने मोठा झटका दिला आहे.
‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. याआधी कुठल्याही रिअॅलिटी शोमध्ये असं घडलं नव्हतं. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ स्पर्धक निवडले गेले आहेत. याचा प्रोमो सध्या खूप व्हायरल झाला आहे.
'बिग बॉस १८'मधील ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या एन्ट्रीचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सलमान खानला हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सलमान खानला भगवद्गीता देतानाचा अनिरुद्धाचार्य महाराज यांचा फोटो होतोय व्हायरल