Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Live Updates, 06 October 2024 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘बिग बॉस’ हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सुरुवातीला फक्त हिंदीमध्ये ‘बिग बॉस’ शो असायचा. पण काही वर्षांपासून ‘बिग बॉस’ आता विविध भाषांमध्ये होतं आहे. तसंच ‘बिग बॉस ओटीटी’देखील पाहायला मिळत आहे. आजपासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात होतं आहे.

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस १८’चा आज ग्रँड प्रिमियर आहे. यंदाही होस्टिंगची धुरा सलमान खान सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांची नाव चर्चेत आहेत. शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, शांति प्रिया, अविनाश मिश्रा, देव चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे आणि गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे. पण यापैकी कोण-कोणते स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जातायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या ग्रँड प्रिमियरमधील प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या…

Bigg Boss Hindi Season 18 Grand Premiere Live, 06 October 2024 | ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार?

Live Updates
21:47 (IST) 6 Oct 2024
सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफी

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला सूरज चव्हाण, तर उपविजेता ठरला अभिजीत सावंत

21:41 (IST) 6 Oct 2024
‘बिग बॉस १८’मध्ये दोन अभिनेत्यांचा प्रवेश

अभिनेता शेहजादा धामी आणि अविनाश मिश्राची ‘बिग बॉस १८’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी

21:23 (IST) 6 Oct 2024
‘बिग बॉस १८’मध्ये ‘या’ अभिनेत्रीची पहिली एन्ट्री

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चाहत पांडेची ‘बिग बॉस’च्या १८व्या जबरदस्त एन्ट्री. आठ वर्ष चाहत अभिनय क्षेत्रात काम करत असून तिने अनेक मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

21:07 (IST) 6 Oct 2024
सलमान खानने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ‘अशी’ केली जबरदस्त सुरुवात

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची हटके सुरुवात झाली आहे. सलमान खानने टॉप-२ फायनलिस्ट जाहीर केल्यानंतर संपूर्ण बिग बॉसच्या आलिशान घराची झलक दाखवण्यात आली आहे.

20:53 (IST) 6 Oct 2024
अवघे काही मिनिट राहिले ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरला

लवकरच ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरला होणार सुरुवात

19:58 (IST) 6 Oct 2024
ग्रँड प्रिमियरच्या काही तासांआधी लोकप्रिय अभिनेत्रीने सलमान खानच्या शोला दिला नकार, पोस्ट करत म्हणाली, “मला दोष…”

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला अवघे काही तास बाकी आहेत. ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण ‘बिग बॉस १८’चे नवनवीन प्रोमो पाहून सध्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. कोण-कोण कलाकार ‘बिग बॉस’च्या या खेळात सहभागी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण अशातच एका अभिनेत्रीने मोठा झटका दिला आहे.

सविस्तर बातमी वाचा

19:47 (IST) 6 Oct 2024
‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, शोच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ फायनलिस्टचा केला खुलासा, कोण आहेत? जाणून घ्या…

‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. याआधी कुठल्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये असं घडलं नव्हतं. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ स्पर्धक निवडले गेले आहेत. याचा प्रोमो सध्या खूप व्हायरल झाला आहे.

सविस्तर बातमी वाचा

19:44 (IST) 6 Oct 2024
गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री, सलमान खानला हसू झालं अनावर, घरात राहणार गाढवाबरोबर! पाहा प्रोमो

‘बिग बॉस १८’मधील ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या एन्ट्रीचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सलमान खानला हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सविस्तर बातमी वाचा

19:38 (IST) 6 Oct 2024
अनिरुद्धाचार्य महाराज यांची ‘बिग बॉस १८’च्या घरात एन्ट्री

सलमान खानला भगवद्‌गीता देतानाचा अनिरुद्धाचार्य महाराज यांचा फोटो होतोय व्हायरल

Bigg Boss 18 Grand Premiere Live Updates : 'बिग बॉस १८'च्या ग्रँड प्रिमियरमधील प्रत्येक अपडेट्स…<br />