Bigg Boss Marathi 5व्या पर्वातील सदस्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. हे पर्व सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये भांडणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच, घरात दोन गट पडल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये जान्हवी किल्लेकरने तोंडघशी पडल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे.

कलर्स मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी किल्लेकर आणि वैभव चव्हाण सोफ्यावर बसलेले असून ते एकमेकांशी गप्पा मारत असल्याचे दिसत आहे.

Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
bigg boss 18 actor shalin bhanot first time talk about dating rumours with eisha singh
Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…
Bigg Boss Marathi Fame sonali patil dance on mala lagali kunachi uchaki song
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ
A Swiggy delivery girl shares the 'hardest' aspect of her job.
“सर्वात अवघड गोष्ट म्हणजे…” स्विगी डिलिव्हरी गर्लने नोकरीबाबत केला खुलासा, पाहा Video Viral

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

व्हिडीओमध्ये पाहायला मिळेते की, जान्हवी किल्लेकर वैभव चव्हाणला म्हणत आहे, “आता मी तिला खूप कमीपणा दाखवू शकले असते. कळलं आम्ही काय करू शकतो, हे तिला दाखवलं असतं. आता तिने मला तोंडघशी पाडलं तर, ती म्हणाली की तुझ्या मित्रांनीच तुझी साथ दिली नाही.” त्यावर वैभव तिला समजावत म्हणतो, “तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते, दाखवू नको, काय गरज आहे दाखवायची.”

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

आता जान्हवी कोणाला कमीपणा दाखवण्याचे बोलत आहे, याबरोबरच कोणामुळे तिला तोंडघशी पडल्यासारखे वाटत आणि जान्हवीच्या कोणत्या मित्रांनी तिला साथ दिली नाही, असे प्रश्न नेटकऱ्यांना पडल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला प्रेमात मिळालेला धोका, निक्की तांबोळीला सांगत म्हणाला, “माझ्याबरोबर चांगली असायची पण…”

दरम्यान, बिग बॉसच्या घरातील कॅप्टन पदासाठी घेतलेला टास्क मोठ्या चर्चेत आहे. या टास्कमध्ये दोन गट करण्यात आले होते. टीम ए आणि टीम बी असे गट होते. दोन्ही गटांना एक-एक बोट दिली होती आणि टीममधील सदस्यांना मोती आणत इतरांना कॅप्टन पदाच्या दावेदारीतून बाहेर काढायचे होते. या टास्कदरम्यान दोन्ही टीममध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले.

आता कॅप्टन पदाच्या या खेळात कोणती टीम पुढे जाणार, कोणत्या टीममधील दुसरा कॅप्टन बनणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घराची पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर बनली होती. त्याबरोबरच, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यानंतर कोणता सदस्य घराला निरोप देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर कोणाची शाळा घेणार आणि कोणाला शाबासकी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader