Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बारामतीजवळच्या मोढवे गावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. एकेकाळी मजुरी करून जगणारा सूरज आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका बिग बॉस बॉस स्पर्धक ठरला आहे. या सूरजला बिग बॉस मराठीमध्ये संदी देणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरने एक पोस्ट केली आहे. सूरजचं बिग बॉस आधीचं आयुष्य, त्याच्या जीवनातील संघर्ष याबाबत त्याने यात लिहिलं आहे.
अभिषेक करंगुटकर हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा कास्टिंग डायरेक्टर आहे. लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या अभिषेकचा सूरजच्या या बिग बॉसच्या प्रवासात मोठा वाटा आहे. त्याने सूरजबरोबरचे बिग बॉस आधीचे व ट्रॉफी जिंकल्यानंतरचे फोटो पोस्ट करत सुंदर कॅप्शन लिहिलं आहे.
हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”
“आपला जन्म कसा, कुठे, केव्हा, कोणत्या कुटुंबात होईल हे सांगता येत नाही….
सोन्याच्या चमच्यातून पहिला घास मिळेल, की कठीण परिस्थितीला सामोर जावं लागेल हे कोणालाच सांगता येत नाही…
हा पण, जन्मताच एक गोष्ट जी आपण सोबत घेऊन येतो, ते म्हणजे आपलं नशीब..!
मग ते ही वाऱ्यासारखं….कधी समाधान देणारी थंड वाऱ्याची झुळूक, तर कधी सगळच उद्ध्वस्त करून जाणारं वादळ, तर कधी सौम्य….शीतल….समुद्राच्या लाटांना, किनाऱ्या पर्यंत सोडणाऱ्या प्रवाहा सारखं…!
सूरजच्या आयुष्यात आज वर अनेक उतार चढाव आलेत…
पण त्याने आई मारी माता, श्री खंडोबा, गणपती बाप्पावर विश्वास ठेवला आणि तो एक एक प्रसंगाला सामोरं गेला…
त्याची अनेक उदाहरणं आहेत पण सोपं उदाहरण द्याचं तर त्याला लिहिता येत नाही, अक्षरांचा आणि अंकांचा गोंधळ आहे…हे त्याने बऱ्याचदा सांगितलं आहे…मग तो फ़ोन कसा वापरत असेल??? एखाद्याचा नंबर कसा लक्षात ठेवत असेल????
लोक प्रॉब्लम समोर येताच रडत बसतात पण त्याने शक्कल लढवली…त्याने इमोजीसचा आधार घेतला आणि लोकांना लक्षात ठेवलं…
ज्याच्याशी नाराजी त्याला ????
जो आपला त्याला ♥️
मित्रांसाठी ?
जरा जास्तच प्रेम असणाऱ्यांना ♥️♥️♥️♥️
बिग बॉस चा खेळच काय, हे जग भावभावनांचं विश्व आहे….!
प्रत्येक दिवशी एक नवीन प्रश्न समोर येतो आणि तो प्रश्न सोडवणं आपलं रोजचं काम…या प्रवासात आपण मूळ विसरता कामा नये…
पहिल्या दिवशी भेटलेला सूरज आणि आज बिग बॉसचा विजेता सूरज या मधे नक्की एक सकारात्मक बदल आहे पण तो मूळ आणि माणसं विसरलेला नाही…. आज, बिग बॉस मराठीचा कास्टिंग डायरेक्टर म्हणून हक्काने, सूरज बिग बॉसच्या घरात जाण्याआधीचा आणि सूरज जिंकून आल्या नंतरचा फोटो अपलोड करावासा वाटला…!
बाकी सूरजला सगळच माहितीये…लवकरच पुन्हा त्याची भेट होईल…!
तोवर गुलीगत धोका देणाऱ्यांना SQRQZQ बुक्कीत टेंगूळ,” अशी पोस्ट अभिषेकने केली आहे.
अभिषेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून सूरजला संधी दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. ‘दादा तुम्ही योग्य माणसाची निवड केली…कोळशाचा हिरा बनवला..तो आधी फेमस होता पन आता तो जगभरात पोहचलाय आणि हे फक्त तुमच्यामुळे..’, ‘तुम्ही देवदूत म्हणून अलात त्याच्या आयुष्यात आणि त्याच आयुष बदलून गेलं’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd