छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरु आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यातील एक अभिनेता म्हणजे पराग कान्हेरे. पराग हा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तो एक प्रसिद्ध शेफ आहे. सध्या बिग बॉसच्या घरातील एका टास्कमुळे त्याला बिग बॉसच्या पर्वातील त्याचे दिवस आठवले आहेत. त्याच आठवणीत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात नुकतंच ‘खुल्ला करायचा राडा’ हे साप्ताहिक कार्य पार पडले. यात टीम बी विजयी ठरली. पराग हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानेही हा टास्क खेळला होता. आता बिग बॉसच्या घरात रंगलेल्या या टास्कवरुन त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने वीणा जगतापने त्याला कशाप्रकारे मदत केली याबद्दल सांगितले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : “स्नेहलतामुळे अनेकांच्या पोटावर पाय आला…” किरण मानेंनी केले गंभीर आरोप

पराग कान्हेरेची फेसबुक पोस्ट

“मानसिकदृष्ट्या सर्वात कठीण खेळ बिग बॉसमध्ये चालू आहे. किरण माने यांचे 100 गुन्हे माफ आहेत आज ज्या पद्धतीने तो खेळला आणि विकासला पाठिंबा दिला. अतिशय उत्तम परफॉर्मन्स.. विरुद्ध संघाकडून विकासचा छळ होत असताना किरण माने अक्षरश: रडला.. ही फेरी संयम आणि सहशिलता बद्दल आहे.. ज्याबद्दल मी जास्त बोलू नये.. मी दोषी होतो आणि मला किंमत मोजावी लागली.. खूप मोठी किंमत!

मला आनंद आहे, किरण माने आणि प्रसाद यांनी आपला संयम सोडला नाही.. चांगले खेळले. मी त्या दिवसाचा विचार करतो जेव्हा मी त्या खुर्चीवर बसलो होतो तेव्हा मला वीणाची खूप आठवण येते… तिने विरुद्ध संघातील खेळाडूंकडून होणारा छळ वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता..ती सतत माझे डोळे पुसत होती आणि त्यांना माझ्यावर हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित ते घडायचेच होते आणि तो बिग बॉसमधील काळा दिवस होता”, असे पराग कान्हेरेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

दरम्यान बिग बॉसचे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. हे पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 2 contestant parag kanhere share instagram post about season 4 veena jagtap memories nrp