मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करत असतात. सोशल मीडियाद्वारे ही कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यापैकी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील ( Sonali Patil ). अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सोनाली ‘बिग बॉस मराठी ३’ ( Bigg Boss Marathi 3 ) नंतर चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनालीने स्वत:च्या हातांनी पुरणपोळ्या बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. देवाच्या नैवेद्यासाठी ती या पुरणपोळ्या करत आहे. आत्मलिंग जत्रेसाठी सोनाली तिच्या मामाच्या गावी गेली होती. यावेळी देवाच्या नैवेद्यासाठी तिने पुरणपोळ्या केल्या आणि याच पुरणपोळ्या बनवताचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. शिवाय याबद्दल स्वत: अभिनेत्रीने माहितीही दिली आहे. “आत्मलिंग जत्रा… मामाचं गाव… पुरणपोळी… सासनकाठी नैवेद्य” असं कॅप्शन लिहित सोनालीने पुरणपोळी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

सोनाली पाटीलचे चाहत्यांकडून कौतुक

एकाने या व्हिडीओखाली “मराठमोळी” असं म्हटलं आहे तर दुसऱ्याने “तू तर सुगरणच आहेस” अशी कमेंट केली आहे. तसंच “खूप छान”, “यातून तुझा साधेपणा दिसतो”, “मस्तच” या आणि अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी सोनालीच्या ( ( Sonali Patil ) पुरणपोळी करतानाच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर तिच्या साधपणाचे कौतुकही केला आहे. सोनाली आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी ३’ ( Bigg Boss Marathi 3 ) मध्ये सहभाग घेतला. या शोमधील तिचा खेळ चाहत्यांना चांगलाच आवडला होता.

दरम्यान, सोनालीच्या ( Sonali Patil ) कामाबद्दल बोलायचे झाले तर ती स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर १’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाली होती. मात्र ‘बिग बॉस मराठी ३’ने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर ‘योग योगेश्वर जय शंकर’ या टीव्ही मालिकेत पाहायला मिळाली. नुकतीच सोनालीने ‘बिग बॉस’मधील मैत्रीण मीनल शाह हिच्या लग्नात खास हजेरी लावली होती. या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.