छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अमृता देशमुखला ओळखले जाते. अमृता ही सध्या ‘नियम आणि अटी लागू’ या नाटकात काम करत आहे. अमृताचा पुण्याची टॉकरवडी ते प्रसिद्ध अभिनेत्री हा प्रवास फार कठीण होता. नुकतंच तिने त्याबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता देशमुख हिने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील त्यानंतर सर्व काही बदलल या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला तिच्या आजारपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने तिला झालेला ट्युमर आणि ते चार दिवस याबद्दल सांगितले.
आणखी वाचा : ‘क्रश’ प्रकरणानंतर पहिल्यांदाच ओंकार भोजने आणि कोण हार्टेड गर्लची भेट, लाजत म्हणाली “‘त्या’नंतर…”

अमृता देशमुख काय म्हणाली?

“मला माझा एक पाय सुजल्यासारखा वाटत होता आणि मी त्यासाठी चेकअप करायला गेले होते. त्यावेळी मला तिथे गाठ असल्याचे समजले. त्यानंतर मग मी त्यावर उपचार घेत होते, ज्यात काही तरी चुकले. यामुळे मग मला एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर मग मुख्य कारण समजलं की मला एक abdominal tumor आहे आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ते न कळण्यामागचं कारण इतकंच होतं की मी अगदी ठणठणीत होते, मला व्यवस्थित चालता, फिरता येत होतं. मला काहीच दुखतंही नव्हतं. माझा पाय सुजला नसता तर कदाचित कधी मला ते कळलंही नसतं.

माझ्या ट्युमरबद्दल कळाल्यानंतर मला शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्याची एक प्रक्रिया असते. मला ट्युमर आहे हे सोनोग्राफीमध्ये कळलं होतं, पण तो नेमका कोणता आहे, याची एक बायोप्सी होते. त्याची एक वेगळी प्रक्रिया असते. माझ्यासाठी तो प्रवास फार अवघड होता. मला त्यावेळी फार टेन्शन आलं होतं. आपण सर्वजण प्रार्थना करत असतो की कर्करोग किंवा इतर कोणताही ट्युमर कधीच होऊ नये. आपण कधीही त्या गोष्टीतून गेलेलो नसतो. त्यामुळे त्याचा आपण कधीच विचार करत नाही”, असे अमृता देशमुखने म्हटले.

आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

“जेव्हा माझ्या ट्युमरची बायोप्सी झाली तेव्हा चार दिवसांनी रिपोर्ट येणार होता. ते चार दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड दिवस होते. त्यावेळी मला याची माहिती होती की, माझ्यापेक्षा माझ्या घरातले याबद्दल जास्त घाबरले आहेत. त्यामुळे मी खूप खंबीरपणे त्याकडे पाहिले. मी त्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकदाही रडले नाही.

मी म्हटलं पाहू नक्की रिपोर्टमध्ये काय येतं. रिपोर्ट आल्यानंतर ती गाठ कर्करोगाची नसल्याचे कळले. तो वेगळा ट्युमर होता आणि त्यावर शस्त्रक्रिया करुन तो काढून टाकावा लागणार होता. त्यानंतर मी माझ्या मास्टर्सची परीक्षा वैगरे दिल्यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मला थोडा काळ पूर्वव्रत होण्यासाठी द्यावा लागला. आपली तब्ब्येत किती महत्त्वाची आहे, हे मला त्या दिवसात कळलं. मला रात्री १० ला झोपायला अजिबात लाज वाटत नाही. दुसऱ्या दिवशी काम असेल तर मला वेळेत झोपायला आवडतं. मला शरीराला गृहीत धरायला आवडत नाही”, असे अमृता देशमुख म्हणाली.