छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व चर्चेत आहे. अभिनेता पुष्कर जोग व मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘बिग बॉस’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली आहे.
सोनाली व पुष्करने एन्ट्री केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांची भेट घेतली. यावेळी सोनालीने एक जुना किस्सा शेअर केला. काही दिवसांपूर्वी वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केलेली राखी सावंत मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज आहे. राखी काही ना काही करुन प्रेक्षकांसह घरातील सदस्यांचं मनोरंजन करताना दिसते. याच राखी सावंतची आई चाहती असल्याचं सोनाली कुलकर्णीने सांगितलं.
हेही वाचा>>‘बेशरम रंग’ वादाच्या भोवऱ्यात असताना शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज, लवकरच होणार बाबा
सोनाली म्हणाली, “माझी आई राखी सावंतची खूप मोठी चाहती आहे. १५ वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट आहे. मी व आई एकदा मॉलमध्ये गेलो होतो. तिथे तिने राखीला पाहिलं आणि आई राखीचं नाव घेत जोरात ओरडली. माझ्या आईने तेव्हा राखीबरोबर फोटोही काढला होता. तो फोटो आजही माझ्याकडे आहे”. राखी सहभागी झालेली ‘बिग बॉस’चे पर्वही सोनालीने पाहिले असल्याचं तिने सांगितलं. शिवाय राखीला सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचंही ती म्हणाली.
“राखी सावंतकडे काय आहे ते मला माहीत नाही. पण सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा ती पूरेपूर प्रयत्न करते. आणि यात ती यशस्वीही होते”, असंही पुढे सोनाली राखीचं कौतुक करत म्हणाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोनालीच्या आईला नक्की भेटणार असल्याचं राखी म्हणाली.