‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अक्षय केळकर विजेता ठरला. अक्षय पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. त्याने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केलं. टास्कमध्ये उत्तम खेळी करत त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. “बिग बॉस मराठीची ट्रॉफी हातात घेतल्याचा तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी नेहमी म्हणायचो ‘हारी बाजी को जितना मुझे आता है’ आणि हे सिद्धही करुन दाखवलं. मी हा शो जिंकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण या खेळासाठी मी सकारात्मक होतो”, असं अक्षय म्हणाला.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे व निमृत कौरमध्ये जवळीक वाढली; अभिनेत्री म्हणते “इस प्यार को…”

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या अक्षयला ट्रॉफी बरोबरच १५ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. याशिवाय त्याला  पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर आणि बेस्ट कॅप्टन ॲाफ सीझनसाठी पाच लाख रुपये मिळाले. बक्षीस म्हणून मिळालेल्या या रकमेचं काय करणार असा प्रश्न मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आला.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखचं डेटिंग, पोस्ट शेअर करत म्हणाले…

अक्षयने यावर उत्तर देत कुटुंबियांसाठी घर घेणार असल्याची इच्छा व्यक्त केली. अक्षय म्हणाला, “मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. माझे बाबा रिक्षाचालक आहेत. त्यामुळे या बक्षिसाच्या रकमेतून मी कुटुंबासाठी घर विकत घेणार आहे”.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 akshay kelkar will buy house from winning amount kak