छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. इतर पर्वांप्रमाणेच ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच आश्चर्याचे धक्के घरातील सदस्यांसद प्रेक्षकांनाही मिळत आहेत. अतिशय लोकप्रिय असलेल्या या शोमध्ये या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्यामुळे मोठा ट्विस्ट आला होता.
विकास सावंतने शनिवारी (१७ नोव्हेंबर) बिग बॉसच्या घरातून एग्झिट घेतल्यानंतर आता अमृता देशमुखचाही प्रवास संपुष्टात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याने अमृताला खेळातून एग्झिट घ्यावी लागली आहे. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. परंतु, नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती.
हेही वाचा >> Bigg Boss Marathi: विकास सावंत घराबाहेर पडताच ढसाढसा रडले किरण माने; भावूक होत म्हणाले “ईक्या लेका…”
पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक नॉमिनेशन टास्कमध्ये अमृताला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेलं पाहायला मिळालं. आता विकास व अमृता घरातून बाहेर पडल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच व आणखी तल्लख बुद्धीने खेळ खेळावा लागणार आहे.
हेही वाचा>> “माझी मुलं मुस्लीम…” बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर
अमृता देशमुख छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘फ्रेशर्स’ या शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. तिने मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक आर.जे. ही आहे. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती प्रसिद्ध आहे.