अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. पहिल्या दिवसापासूनच अक्षय ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील चर्चेतील चेहरा होता. उत्तम खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं. महेश मांजरेकरांनीही अनेकदा चावडीवर त्याचं कौतुक केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या टॉप ५ मध्ये स्थान मिळवलेल्या अमृता धोंगडेने घराबाहेर येताच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अक्षय केळकरबरोबरच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. याबरोबरच यंदाच्या बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे आधीच माहीत असल्याचा खुलासा तिने केला आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अमृता धोंगडेचं अपूर्वा नेमळेकरबाबत मोठं वक्तव्य, म्हणाली “ती…”

हेही वाचा>>‘RRR’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, पण…

अमृता म्हणाली, “अक्षय केळकर या पर्वाचा विजेता होईल, याचा अंदाज मला आला होता. तो एक प्रामाणिक खेळाडूसारखा खेळला. आमच्या दोघांत फार चांगली मैत्री झाली. सुरुवातीपासूनच त्याचा खेळ उत्तम होता”.

हेही वाचा>>“तू पुरुष आहेस का?”, ‘बिग बॉस’च्या घरात फराह खानचा साजिदला सवाल

अमृता धोंगडेने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. झी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. कोल्हापूरची मिरची असलेल्या अमृता धोंगडेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु, तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 amruta dhongade on akshay kelkar kak