‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अंतिमसोहळा काल पार पडला. अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. घरातील अपूर्वा नेमळेकर, किरण माने व अमृता धोंगडे या सदस्यांनी टॉप ४ मध्ये स्थान मिळवलं. चौथ्या स्थानावर राहिलेली अमृता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना भावूक झालेली पाहायला मिळाली.
कोल्हापूरच्या अमृताने पहिल्या दिवसापासूनच ठसकेबाजपणा दाखवायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही अमृता ‘बिग बॉस’च्या घरात आक्रमक झालेली पाहायला मिळाली. अमृताचा घरातील वावर व उत्तम खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु, बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं तिचं स्वप्न अर्धवटच राहिलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अमृताने तिच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे.
अमृताने पोस्टद्वारे प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “महाराष्ट्राची मिरचीकडून तुम्हा सर्वाचे खूप आभार. या प्रेमासाठी तुमची अमू कायम ऋणी राहील. वर्च्युअल भेट तर गेले १०० दिवस होतच होती…पण आता प्रत्यक्षात लवकरच भेटुया. प्रेम कायम ठेवा. ‘जाळ अन् धूर संगटच’…”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांनी अमृताच्या पोस्टवर कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा>> “अशोक सराफ यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं…” राज ठाकरे स्पष्टच बोलले
हेही पाहा>> “चांगल्या स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलणकरचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य
अमृता एक अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.