‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा नुकताच शेवट झाला आहे. अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची रनर अप ठरली. कोल्हापूरची मिरची असलेल्या अमृता धोंगडेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु, तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अमृताने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “अक्षय केळकर या पर्वाचा विजेता होईल, याचा अंदाज मला आला होता. तो एक प्रामाणिक खेळाडूसारखा खेळला. आमच्या दोघांत फार चांगली मैत्री झाली. सुरुवातीपासूनच त्याचा खेळ उत्तम होता”.

हेही वाचा>> चार दिवस व्हेंटिलेटरवर होती ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा>> आर्यन खानला डेट करण्याच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली “तो खूप…”

अमृता धोंगडेने अपूर्वा नेमळेकरबद्दलच्या नात्याबाबतही या मुलाखतीत भाष्य केलं. “अपूर्वाबरोबर घरात माझं नेहमी भांडण व्हायचं. अपूर्वाने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी, असं मला कधीच वाटलं नाही. मला तिच्यामुळे त्रास होतो, हे तिला माहीत होतं. पण, हे तिने खूप चांगल्या पद्धतीने घेतलं. याचा मला आनंद आहे”, असंही अमृता म्हणाली.

हेही वाचा>>“तू पुरुष आहेस का?”, ‘बिग बॉस’च्या घरात फराह खानचा साजिदला सवाल

अमृता धोंगडेने अनेक मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. झी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 amruta dhongade said i never wanted apurva nemlekar to win this show kak