‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. अतिशय वादग्रस्त असला तरी हा शो तितक्याच आवडीने घराघरात पाहिला जातो. ‘ऑल इज वेल’ ही यंदाच्या पर्वाची थीम असली तरी पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे.

पहिल्याच दिवशी घरातील चार सदस्य बाहेर जाणार असल्याची घोषणा करत ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताना स्पर्धकांना लाल, पिवळा, निळा आणि जांभळा अशा चार रंगाचे बॅण्ड देऊन गट पाडण्यात आले. सदस्यांनी आपल्या गटातील एका सदस्याला बहुमताने ‘बिग बॉस’च्या घरातील निरुपयोगी सदस्य म्हणून घोषित करायचे आहे. या टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात वाद झाला.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…

हेही वाचा >> पुरस्कार सोहळ्यात भाषण देत होती आलिया भट्ट, बाळाने पोटात पाय मारला अन्…

अपूर्वाने प्रसादचं नाव घेत तिचं मत मांडलं. परंतु प्रसादला ते पटलं नाही आणि त्यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आलं. “हा कुस्तीचा खेळ नव्हे. आणि तुला असं का वाटतं की तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा उत्तम आहेस?”, असं अपूर्वा म्हणाली. यावर प्रसाद उत्तर देत “हा कुस्तीचा खेळ नाहीये. मग…”, असं म्हणाला. यावरून अपूर्वा प्रसादला मध्येच थांबवत म्हणाली, “तू मला बोलू देणार आहेस का? की स्वतः एकटाच बोलणार आहेस?”. त्यानंतर या दोघांमधील वाद वाढतच गेला.

हेही वाचा >> प्रिया बापटचा वेब सीरिजमधील बोल्ड सीनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आई म्हणाली, “चूक झाली…”

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावात कंगना रणौतने ‘या’ दोन गोष्टींवर लावली बोली, अयोध्येतील राम मंदिराशी आहे खास कनेक्शन

प्रसाद अपूर्वाला म्हणाला, “तू बोलीस त्यावर मी उत्तर दिलं. मी फक्त फास्ट ऐकलं बाकी काही नाही”. त्याच्या या उत्तरावर अपूर्वा म्हणाली, “तू बोल. मी तुझा आदर करते. आता शांतपणे मी काय बोलते ते पण ऐक. हा कुस्तीचा खेळ नसल्याने त्याच्या शरीरयष्टीवरून निर्णय घेणं मला अत्यंत चुकीचं वाटतं. तो स्ट्रॉंग आहे. तुझ्यासारख्या उद्धट व्यक्तीबरोबर खेळण्यापेक्षा मला अशा स्ट्रॉंग स्पर्धकाबरोबर खेळायला जास्त आवडेल”.  

हेही पाहा >> Photos : ‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या बहिणीची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

प्रसादला अपूर्वाचे हे म्हणणे पटले नाही.  त्यावर तो तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला, “उद्धट वैगरे अजिबात बोलू नकोस”. यावर अपूर्वा “माझ्याशी बोटं खाली करून बोलायचं. मला ‘बिग बॉस’ने माझं मत विचारलं. मी तुझ्याविरोधात मत दिलं आहे”, असं म्हणाली. पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुढे टास्क सुरु झाल्यावर स्पर्धकांमध्ये आणखी वाद-विवाद बघायला मिळणार आहेत.  

Story img Loader