कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये एक ट्विस्ट आला. गेल्या आठवड्याअखेर झालेल्या एलिमिनेशनमध्ये यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. तर किरण मानेही घराबाहेर जाणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं. पण किरण यांना ‘बिग बॉस’ने विशेष अधिकार देत सीक्रेट रूममध्ये ठेवलं आहे. ते घरातून बाहेर पडताच विकास सावंतने चक्क अपूर्वा नेमळेकरशी मैत्री केली. आता विकासमुळे अपूर्वा रडली असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले
‘बिग बॉस’ने विकास व अपूर्वाला एक टास्क दिला आहे. या दोघांना एकाच बेल्टने बांधण्यात आलं आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी संपूर्ण घरामध्ये विकास व अपूर्वाला एकत्र फिरावं लागतं. तसेच एकमेकांना समजून दोघांनाही आपापली कामं करावी लागत आहेत. यादरम्यानच अपूर्वाला रडू कोसळतं.
विकास अपूर्वाला बोलतो, “तू माझ्या बेडवर बसून मेकअप करू शकत नाही का?” यावर अपूर्वा म्हणते, “नाही. माझं मेकअपचं सामना सगळं इथे (अपूर्वाच्या बेडजवळ) आहे. हे सामान घेऊन तिथे जा तिथून इथे या.” अपूर्वाचं बोलून झाल्यानंतर “तू एवढं करू शकत नाही का?” असं विकास बोलतो. त्यानंतर अपूर्वा चिडते.
आणखी वाचा – “…आणि त्या रात्री मी खूप रडलो” ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंचा अफेअरबाबत खुलासा
अपूर्वा म्हणते, “प्रत्येकजण इथे आरशाजवळच मेकअप करतो. तिथे जाऊन काय होणार आहे? तुझ्या बेडजवळ जाऊन मेकअप करायचा आहे तर चल. तुला सिद्ध काय करायचं आहे? मी तुला त्रास देत आहे असं तुला सिद्ध करायचं आहे का? मी तुझ्याबरोबर तसं वागतही नाही. मुद्दाम मला दुखावू नकोस. तू जे करत आहेस ते अत्यंत चुकीचं आहे. मगाशी मला म्हणाला मी नाही उठणार. माझे पाय दुखत आहेत. मी फळं खायला येणार नाही. तो नाही बोलल्यानंतर मी फळं नाही खाल्ली. ते कोणी इथे बघत नाही. मी छळते असे उगाच माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. तू मोठा गेमर आहेस. तू या सगळ्याचा आनंद घेत आहेस.” हे सारं बोलत असताना अपूर्वाला रडू कोसळतं. यानंतर अपूर्वा व विकासच्या मैत्रीमध्ये फुट पडणार का? हे पाहावं लागेल.