‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे काहीच आठवडे शिल्लक आहेत. हा आठवडा घरात फॅलिमी वीक असणार आहे. घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अमृता धोंगडे, अपूर्वा नेमळेकर व किरण मानेंचे कुटुंबीयांनी बिग बॉसमध्ये हजेरी लावली.

कुटुंबियांना पाहताच घरातील सदस्य भावूक झालेले पाहायला मिळाले. अपूर्वाची आई व मामा ‘बिग बॉस’च्या फॅमिली स्पेशल वीकमध्ये सहभागी झाले. मामा व आईला पाहताच अपूर्वा भावूक झाली होती. आईच्या गळ्यात पडून ती रडायलाच लागली. ‘बिग बॉस’च्या घरात घेऊन यायचं वचन मी पूर्ण केल्याचंही अपूर्वी तिच्या आईला म्हणाली. घरातील इतर सदस्यांना भेटल्यानंतर अपूर्वाच्या आईने तिला मोलाचा सल्ला दिला.

हेही वाचा>>“देवोलिना भट्टाचार्जी अभिजीत बिचुकलेचे कपडे धुवायची”, राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा

हेही वाचा>> Video: समीर चौगुलेंच्या आवाजावरुन बादशहाच्या गाण्याला म्युझिक; चाहत्याने एडिट केलेला व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

“अपूर्वा तू छान खेळत आहेस. तुला सगळ्यात जास्त धोका अक्षय केळकरपासून आहे. त्याच्यापासून दूर राहा. तू तुझं खेळ”, असं अपूर्वाची आई तिला म्हणाली. यावर अपूर्वा “विश्वास ठेवणं हे माझं काम आहे. समोरच्याला फसवायचं असेल तर मी काही करू शकत नाही”, असं आईला म्हणते. अपूर्वाच्या मामानेही तिला अक्षयपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

अपूर्वाच्या आईने विकास व अपूर्वाच्या मैत्रीचं कौतुकही केलं. “विकास व तुझं काम छान होतं. तुम्हाला दोघांना बघताना मज्जा यायची. सगळ्यांना तुमची जोडी खूप आवडायची”, असंही अपूर्वाची आई म्हणाली. आता शेवटचे काही आठवडे शिल्लक असताना खेळात टिकून राहण्यासाठी घरातील सदस्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Story img Loader