‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. आरोह वेलणकरने खेळातून एग्झिट घेतल्यानंतर त्याचा घरातील प्रवास संपुष्टात आला आहे. अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत.
टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची फायनलिस्ट ठरली. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील टॉप पाच फायनलिस्ट घोषित झाल्यानंतर अपूर्वाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अपूर्वाचा लाल रंगाच्या साडीतील फोटो तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>>दीपिका-रणवीर २०२३ मध्ये होणार आईबाबा? अभिनेत्री म्हणालेली “आम्हाला मूल हवं आहे, पण…”
हेही वाचा>>राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग; म्हणाली “अन्याय व द्वेष…”
अपूर्वाच्या या फोटोला “लाल रंगाची साडी नेसणाऱ्यांनाच माहीत आहे त्यांच्याकडे किती शक्ती असते”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. “कोणीही यावं कोणीही जावं शेवटी मीच जिंकावं”, असंही पुढे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>>“मी बाहेर आलोय पण…”, ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर आरोह वेलणकरची पोस्ट
अपूर्वा पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. ८ जानेवारीला ‘बिग बॉस’चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाची ट्रॉफी नावावर कोण करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.