‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के ‘बिग बॉस’ देत असतात. घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर एक आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच अपूर्वाने तिचा जम बसवायला सुरुवात केली होती. प्रेक्षकांनाही अपूर्वाचा खेळ आवडतो.

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत शेवंता हे पात्र साकारुन अपूर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. २०११ साली आभास हा मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलेल्या अपूर्वाला शेवंतामुळे लोकप्रियता मिळाली. अपूर्वा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिली आहे. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बराच काळ सिंगल राहिलेली अपुर्वा लग्नासाठी मुलाच्या शोधात आहे. ‘बिग बॉस’च्याच घरात अपूर्वाने दुसरं लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली.

devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
bigg boss marathi meenal shah built luxurious bungalow in goa
Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”
Rahul Vaidya
‘बिग बॉस १४’फेम गायक राहुल वैद्यने घेतले मुंबईत घर; किंमत वाचून व्हाल थक्क
Jahnavi Killekar
बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का? जान्हवी किल्लेकर म्हणाली, “तसंही महाराष्ट्र मला खलनायिका…”

हेही वाचा >> “आपके बाप का…” अनुपम खेर यांनी सांगितला किशोर कुमार यांच्याबरोबर घडलेला ‘तो’ किस्सा

हेही वाचा >> “१५ वर्षीय मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श…” सुश्मिता सेनने सांगितला ‘तो’ प्रसंग

‘बिग बॉस’च्या घरातील डायनिंग टेबलवर अक्षय केळकर, अमृता देशमुख व अपूर्वा गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात अक्षय अपूर्वाला म्हणाला “मला सांगते लग्न कर. तुझं लग्नाचं वय उलटून गेलं आहे”. यावर अमृता त्याला “असं काही लग्नाच वय वगैरे नसतं बरं का”, असं म्हणते. अपूर्वा अक्षयला उत्तर देत म्हणते “लग्न करण्यासाठी तसा मुलगा पण भेटायला हवा ना. ट्रॅजेडी बॉक्स माझ्या आयुष्यात अजून आलाच नाहीये”. यावर अमृता “मला नुसता बॉक्सही चालेल. ट्रॅजेडी नसलेला…” असं अपूर्वाला म्हणते.

हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

अमृताच्या या वाक्यावर अपूर्वा म्हणते “म्हणजे तुझ्या काहीच अटी नाही आहेत. तुला केस नसलेला टकला मुलगाही चालेल का मग. मला चालेल. चांगला मुलगा असेल तर मी टकल्या मुलाशीही लग्न करायला तयार आहे”.  अपूर्वाने ‘बिग बॉस’च्या घरात केलेल्या या वक्तव्याबद्दल चर्चा रंगली आहे.