‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने गेल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. अक्षय केळकरने यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर पहिल्या दिवसापासून घरात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.
अपूर्वाने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अपूर्वाने बिग बॉसच्या घरातील प्रवास व वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. अपूर्वा म्हणाली, “मी ज्याप्रकारे हा खेळ खेळले, त्याचा मला आनंद आहे. माझा खेळ स्ट्रॉंग व चांगला होता. घरातील इतर सदस्यांसाठी मी स्ट्रॉंग स्पर्धक होते. त्यांच्याशी मी उत्तम स्पर्धा करू शकले, याचा मला अभिमान आहे”.
हेही वाचा>> रणदीप हुड्डाला घोडेस्वारी करताना दुखापत; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
हेही वाचा>> आलिया-रणबीरच्या लेकीबाबत तज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले…
अपूर्वाने होस्ट महेश मांजरेकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “होस्ट महेश मांजरेकरांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन न करता मी माझा खेळ खेळले. जे सदस्य मांजरेकरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वागले, ते सगळ्यात आधी घराबाहेर पडले”, असं अपूर्वा म्हणाली.
हेही वाचा>>अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”
‘बिग बॉस’च्या घरात प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेल्या अपूर्वाने अनेक मालिका व नाटकांत काम केलं आहे. ‘आभास हा’ मालिकेतून अपूर्वाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली.