‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या पहिल्या भागापासूनच चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. घरात कोणातीही टास्क असो अपूर्वाचा राडा व गोंधळ पाहायला मिळतो. आताही घरातील एका कॅप्टन्सी टास्कदरम्यान अपूर्वाचा राग अनावर झाला असल्याचं दिसणार आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : अंगावर धावून आली, हात उचलला अन्…; अपूर्वा नेमळेकरचा ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, नेमकं काय घडलं?

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. युध्द्व कॅप्टन्सीचे हे कार्य कॅप्टन्सीसाठी सदस्यांना करावं लागणार आहे. या भागामध्ये सदस्यांमध्ये भांडण व वाद रंगणार असल्याचं चित्र नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

अपूर्वा व तेजस्विनी लोणारीमध्ये या कार्यादरम्यान वाद रंगणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अपूर्वा तेजस्विनीला म्हणते, “एकच स्ट्रॅटेजि आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय. तुझ्याकडून अपेक्षा नव्हती.” यावर तेजस्विनी तिला म्हणते, “हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस.”

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

तेजस्विनीला उत्तर देत अपूर्वाला म्हणते, “मी नाही त्यातली, कडी लाव आतली.” या दोघींमध्ये शाब्दिक वाद वाढणार असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीजण तेजस्विनीला तर काही प्रेक्षक अपूर्वाला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता आजच्या भागामध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं आणखीनच रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 apurva nemlekar tejaswini lonari fight between captancy task video viral on social media kmd