‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अतिशय वादग्रस्त असला तरीही तितक्याच आवडीने हा शो पाहिला जातो. यंदाच्या पर्वात कॉमन मॅन त्रिशूल मराठेचीही एन्ट्री झाली होती. परंतु, गेल्याच आठवड्यात त्रिशूल घराबाहेर पडला. त्रिशूलने बाहेर आल्यानंतर घरातील अनेक गोष्टींबाबत खुलासे केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिशूलने ‘ईटाइम्स टीव्ही’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्रिशूलने घरातील सदस्यांपैकी फायनलपर्यंत कोणते स्पर्धक जाऊ शकतात, याबाबत त्याचं मत मांडलं. “मला वाटतं, अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या टॉप फायनलिस्टपैकी एक असेल. ती एक खूप स्ट्रॉंग स्पर्धक आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. ती मनोरंजनाचं एक पूर्ण पॅकेज आहे. अपूर्वा नक्कीच हा शो जिंकू शकते”, असं तो म्हणाला.

हेही वाचा >> “दीड वर्षानंतर पहिल्यांदा आईने कुंकू…”, वडिलांच्या निधनानंतर ‘आई कुठे काय करते’मधील अनघाची भावनिक पोस्ट

त्रिशूल पुढे म्हणाला, “विकास सावंत, अक्षय केळकर आणि समृद्धी जाधव घरातील हे सदस्यही स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. विकास या खेळात खूप पुढे जाऊ शकतो. विकास ज्याप्रकारे टास्क खेळतो, हे खूप उल्लेखनीय आहे. तो टास्कमास्टर आहे”. ‘बिग बॉस’च्या घरात सेलिब्रिटींबरोबर राहता आल्यामुळे त्रिशूलला खूप छान वाटल्याचंही तो म्हणाला. “मी एक सामान्य व्यक्ती म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. परंतु, घरातून बाहेर पडताना मी एक सेलिब्रिटी झालो. घरातील इतर सदस्य आणि सेलिब्रिटींबरोबर छान वेळ घालवता आल्यामुळे मी आनंदी आहे”.

हेही पाहा >> Photos : ६० तोळे सोने, म्हाडाचं घर अन्…, दीपाली सय्यद यांची एकूण संपत्ती माहितीये का? डोक्यावर आहे ३२ लाखांचं कर्जही

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. यंदाच्या आठवड्यात कॉलेज विशेष थीमवर आधारित टास्क असणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये टास्क खेळताना जुगलबंदी दिसून येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 apurva nemlekar will win this show said trishul marathe kak