‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला यंदाचे टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. घरातील टॉप सहा सदस्यांमध्ये स्थान मिळविलेल्या आरोह वेलणकरने बुधवारी(४ जानेवारी) खेळातून एग्झिट घेतली. आरोहचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपुष्टात आला आहे.
वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा होता. स्ट्रॅटेजीच्या जोरावर उत्तम खेळी करत आरोह खेळात टिकून राहिला. परंतु, अखेर खेळातून बाहेर पडावं लागल्याने त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. घरातून बाहेर पडताच आरोहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. “मी बाहेर आलोय, पण तुम्ही माझ्या मनात कायम राहाल”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोह खेळातील आठवणीत रमला आहे. फोटो पोस्ट करत त्याने “आनंदी क्षणांना आठवूया…बिग बॉसच्या घराने खरंच वेड लावलंय”, असं म्हटलं आहे. याआधीही बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात आरोह सहभागी झाला होता. परंतु, तेव्हाही त्याचा प्रवास अर्ध्यावरच संपुष्टात आला होता.
हेही वाचा>> दीपिका-रणवीर २०२३ मध्ये होणार आईबाबा? अभिनेत्री म्हणालेली “आम्हाला मूल हवं आहे, पण…”
हेही वाचा>>आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
आरोह वेलणकरने एक्झिट घेतल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. ८ जानेवारीला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाची ट्रॉफी नावावर कोण करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.