‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले. रविवारी प्रसाद जवादेने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. तर बुधवारी पार पडलेल्या नॉमिनेशनमध्ये आरोह वेलणकरचा घरातील प्रवास संपुष्टात आला.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोहने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. आरोहने यंदाच्या पर्वातील नॉमिनेशनवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तो म्हणाला, “बिग बॉसच्या चौथ्या पर्वात अनेक ट्वीस्ट होते. प्रसाद जवादे व अमृता देशमुख चांगले स्पर्धक होते. त्यांच्या घरातून बाहेर जाण्याने मलाही धक्का बसला होता. मी त्यांना टॉप ५ फायनलिस्टमध्ये बघत होतो. वाईट व नकारात्मक वृत्तीचे स्पर्धक घरात आहेत आणि सकारात्मक स्पर्धकांना बाहरे काढलं गेलं आहे”.

Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli tweeted Kindness Chivalry and Respect fans
Virat Kohli Tweet : विराटचे प्रत्येकी एका शब्दाचे तीन ट्वीट चाहत्यांसाठी ठरले कोडे, कोणाबद्दल आणि काय केली पोस्ट जाणून घ्या?
Mahesh Manjrekar And Riteish Deshmukh
“बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांसाठी महेश सरच परफेक्ट…”, आधीच्या पर्वातील स्पर्धकाचे स्पष्ट वक्तव्य, “रितेश सर खूपच…”
Ireland all rounder Simi Singh
Simi Singh Liver Transplant : स्टार अष्टपैलू खेळाडूचा पत्नीमुळे वाचला जीव, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली यशस्वी
indian athletes performance in paralympics 2024
अन्वयार्थ : अक्षय क्षमतांचे क्षितिज!
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
Suryakumar Yadav Injury Updates in Marathi
Suryakumar Yadav Injury : सूर्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! दुलीप ट्रॉफी खेळणार की नाही? टीम इंडियाची वाढली डोकेदुखी

हेही वाचा>>“मी बाहेर आलोय पण…”, ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर आरोह वेलणकरची पोस्ट

हेही वाचा>>“…शेवटी मीच जिंकावं”, ‘बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

“घरातील सदस्यांपैकी मी एक उत्कृष्ट स्पर्धक होतो. मी खेळातून बाहेर पडेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पात्रता नसलेले सदस्य अजूनही घरात व टॉप ५ मध्ये आहेत. मला यावर आता जास्त बोलायचं नाही. कारण, मी घरातून बाहेर पडलो आहे. पण मी माझा खेळ उत्तमरित्या खेळलो”, असंही पुढे आरोह म्हणला.

हेही वाचा>>उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…

आरोह वेलणकरने एक्झिट घेतल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. रविवारी, ८ जानेवारीला होणाऱ्या अंतिम सोहळ्यात ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे.