अभिनेता अक्षय केळकर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’चं हे सीझन वाद-विवाद, सदस्यांमधील मैत्री अशा बऱ्याच कारणांसाठी चर्चेचा विषय ठरलं. अपूर्वा नेमळेकरपासून ते अगदी विकास सावंतपर्यंत या सगळ्या सदस्यांनी अगदी प्रेक्षकांना वेड लावलं. यामध्ये आणखी एक चेहरा सतत चर्चेत राहिला तो म्हणजे किरण माने. किरण माने यांनीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

किरण माने हे ‘बिग बॉस मराठी’मधील टॉप तीन स्पर्धक होते. थोडक्यात ट्रॉफीपासून ते दूर राहिले. पण त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मुळचे सातारचे असणारे किरण माने त्यांना मिळत असणाऱ्या प्रेमामुळे भारावून गेले आहेत. त्यांचं मुळ गाव सातारामध्ये किरण पोहोचले असता चक्क त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

पाहा व्हिडीओ

आता किरण यांनी त्यांची मिरवणूक काढण्याता आली त्यादरम्यानचा व्हिडीओ फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सातारच्या रस्त्यावर चाहते किरण यांना भेटण्यासाठी गर्दी करत असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं चित्र या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Photos : घर, सोन्याचे दागिने अन् शेतजमीन; कोट्यवधींची मालकीण असलेल्या अमृता फडणवीसांवर आहे ६२ लाखांचं कर्ज

कोणी किरण यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी धडपडत होतं तर कोणी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालत होतं. किरण यांच्यासाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा होता. “राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवताच माझ्या माणसांनी अशा जल्लोषात स्वागत केलं. मन भरून आलं गड्याहो…शब्द नाहीत…” अशा शब्दांमध्ये किरण यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. किरण यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 contestant kiran mane rally in satara actor gets emotional video goes viral on social media see details kmd