‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतने घरात एन्ट्री केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारसा चर्चेत नसणारा विकास हळूहळू मात्र ‘बिग बॉस’च्या घरात राडे करायला लागला. टास्क खेळण्याची त्याची पद्धत तर कमालीची होती. मात्र काही आठवड्यांपूर्वी त्याला या घरामधून बाहेर पडावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

‘बिग बॉस मराठी’चा खेळ विकासला अर्ध्यावर सोडावा लागला. मात्र या शोमुळे त्याच्या चाहतावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विकास सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय झाला आहे. तो त्याच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.

काही दिवसांपूर्वीच विकासने त्याच्या घरामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये तो त्याच्या स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवताना दिसत आहे. घरातील मंडळींसाठी ऑम्लेट विकास बनवत आहे. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरामध्येही विकास ऑम्लेट बनवायचा.

आणखी वाचा – Video : खऱ्या आयुष्यात आलिशान घरात राहते ‘तू तेव्हा तशी’मधील अनामिका, शिल्पा तुळसकरनेच शेअर केला व्हिडीओ

विकासने त्याच्या घरातील व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण.” या व्हिडीओमध्ये विकासचा साधेपणा दिसून येत आहे. तसेच खुर्चीवर चढून विकास अंड बनवताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय महेश मांजरेकरांनी विकासला मराठी चित्रपटाची ऑफर दिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 contestant vikas sawant real home video goes viral on social media see details kmd