‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. अक्षय केळकरने चौथ्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आरोह वेलणकरनेही ‘बिग बॉस’च्या घरात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. परंतु, यंदाच्या पर्वातील शेवटचा कॅप्टन ठरलेल्या आरोहला टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशनमध्ये आरोह वेलणकर घरातून बाहेर पडला. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपुष्टात आल्यानंतर आरोहने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या ‘बिग बॉस’मधील प्रवासाबाबत भाष्य केलं. “अंतिम सोहळ्याच्या जवळ जाऊन मी घरातून बाहेर पडलो. खेळात हार जीत होत असते. पण या घराने मला चांगल्या-वाईट आठवणी दिल्या आहेत. यंदाच्या पर्वातील प्रवास खूप छान होता”, असं तो म्हणाला.

हेही वाचा>> Bigg Boss 16: साजिदला पाहताच फराह खान भावूक; शिव ठाकरेला मिठी मारत म्हणाली “तू माझा…”

हेही पाहा>> “चांगल्या स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलणकरचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य

घरातील सदस्यांबाबत अनेक खुलासेही आरोहने व्हिडीओत केले. तो म्हणाला, “या पर्वात माझी कोणाशीही माझी घट्ट मैत्री झाली नाही. वाइल्ड कार्ड म्हणून मला टार्गेट केलं गेलं. प्रत्येक जण त्यांच्या बाजूने बरोबर होता”. आरोहने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याने “ट्रॉफी वगैरे सगळं ठीक असतं, पण प्रवास फार महत्त्वाचा आहे”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हुकल्यानंतर अमृता धोंगडेची पोस्ट, म्हणाली “आता प्रत्यक्षात…”

आरोह वेलणकरने वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही तो सहभागी झाला होता. घरातून बाहेर पडताच आरोहने ‘हिंदी बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 fame aroh welankar post goes viral kak
Show comments