‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व लोकप्रिय ठरलं. या पर्वात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता किरण मानेही सहभागी झाले होते. तल्लख बुद्धीने खेळी करत किरण मानेंनी यंदाच्या पर्वाच्या टॉप पाचमध्ये स्थान मिळवलं. परंतु, त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. फेसबुकवर किरण मानेंनी एका वर्षापूर्वीची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “काट लो जुबान, आसूओं से गाऊंगा…गाड दो, बीज हूं मे, पेड बन ही जाऊंगा!”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?

हेही वाचा>> वाद चिघळला! उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात दाखल केली तक्रार

वर्षभरापूर्वीची पोस्ट किरण मानेंनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “बोललो ते करून दाखवलं भावांनो! आज बरोबर एक वर्ष झालं! कुठलीही चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती.  त्यावेळी बी तुम्ही भरभरून सपोर्ट केलावता. आज माझ्या आनंदसोहळ्यात तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायच. पन, त्यावेळी मला विरोध करनारेबी कौतुकाची, मायेची बरसात करतायत!!! सगळ्यांचेच मनापास्नं आभार. मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या “बोले तैसा चाले” या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटंल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो. लब्यू”, असं त्यांनी म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> अमृता फडणवीसांचा शिव ठाकरेला पाठिंबा, म्हणाल्या “महाराष्ट्राचा..”

(

दरम्यान, किरण माने ‘बिग बॉस’मधून साताऱ्यात परतल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यांची मिरवणूकही काढण्यात आली होती. साताऱ्यातील रस्त्यांवर त्यांचे होर्डिंगही लावण्यात आले होते. त्याचे फोटो व व्हिडीओही किरण मानेंनी शेअर केले आहेत.

Story img Loader